Google Doodle : 100 व्या जयंती निमित्त कवयित्री अमृता प्रीतम यांना आदरांजली!

Google Doodle : 100 व्या जयंती निमित्त कवयित्री अमृता प्रीतम यांना आदरांजली!

Amruta Pritam : 20 व्या शतकातील कवयित्री म्हणून अमृता या साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : अमृता प्रीतम यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त एक खास डूडल तयार केलं आहे. पंजाबी कवयित्री, साहित्यिक असलेल्या अमृता यांनी सर्वच भाषांवर आपली छाप पाडली. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला होता. हळव्या मनाच्या असलेल्या अमृता या बंडखोरसुद्धा होत्या. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गुजरांवाला शहरात 31 ऑगस्ट 1919 ला अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. त्यांचा बालविवाह झाला होता.

वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांच्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रीतमसिंहांशी त्यांचं लग्न झालं. दरम्यान, त्यांचं साहीर लुधियानवी यांच्यावर प्रेम जडलं. मात्र, याचवेळी चित्रकार इमरोज यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासोबत नात्याला कोणतंही नाव न देता 40 वर्ष आयुष्य घालवलं. लाहोरमध्ये लहानाची मोठी झालेल्या अमृता यांचं शिक्षणही तिथंच झालं. त्यांचं आत्मचरित्र 'रसीदी टिकट' खूप गाजलं. त्यांच्या अनेक पुस्तकांचा इतर भाषांमध्ये अनुवाद झाला.

अवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांनी पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला होता. 20 व्या शतकातील कवयित्री म्हणून अमृता या साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी 100 हून अधिक पुस्तकं लिहली. यामध्ये चरित्र, कविता, पंजाबी लोकगीतं याशिवाय इतर भाषांमधीलही आत्मचरित्रं लिहली. ज्ञानपीठ पुरस्कारासह त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

एकेकाळी 'हँडसम बॉय' असलेला अक्षय खन्ना आता दिसतो असा, PHOTO VIRAL

महाराजांनी गौरवलेल्या एका आईची साहसकथा, 'हिरकणी'चं Motion Poster रिलीज

====================================================================

VIDEO: गणेशोत्सवाच्या 'या' दिवसांत रात्री 12 पर्यंत स्पीकर्सना परवानगी इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या