Home /News /entertainment /

Video : अमृता पवारची होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमॅंटिक डेट; फुल्ल टू रोमान्स करताना दिसलं स्वीट कपल

Video : अमृता पवारची होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमॅंटिक डेट; फुल्ल टू रोमान्स करताना दिसलं स्वीट कपल

सोशल मीडियावर सध्या अमृताचा तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक डेटचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे स्वीट कपल फुल्ल टू रोमान्स (amruta pawar neel patil video ) करताना दिसत आहे

  मुंबई, 2 मे : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava) मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) हिचा 4 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर सध्या अमृताचा तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक डेटचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे स्वीट कपल फुल्ल टू रोमान्स (amruta pawar neel patil video ) करताना दिसत आहे. अमृता पवारचा साखरपुडा 4 एप्रिल रोजी झाला होता. नुकताच अमृतानं तिच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला होता. अमृतानं नील पाटील (neel patil) याच्यासोबत साखरपुडा केला आहे. नील हा बायोमेडिकल इंजीनियर आहे. अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्या खास रोमॅंटिक अशा डेटचं आयोजन केलं होतं. या डेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-मराठीतील 'बाहुबली' दिसणार मधुर भंडारकरांच्या सिनेमात, साकरणार महत्त्वपूर्ण भूमिक अमृतासाठी नीलनं खास बोटीमध्ये डेटचं ( amruta pawar neel patil romantic date)  आय़ोजन केलं होतं. नीळा समुद्र आणि त्यात या दोघांची प्रेमाची बोट असं काहीसं चित्र या व्हिडिओमध्ये पाहायला मिळात आहे. नीलनं अगदी फिल्मी स्टाईलनं अमृताला गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देत प्रोपज केल्याचे दिसत आहे. कपल फुल्ल टू रोमान्स करताना दिसत आहे. दोघंही समुद्राच्या शांतेत आणि एकमेकांच्या सहवासात हारवून गेल्याचे यात दिसत आहे. अनेकांनी नीलचं अशा रोमॅंटिक डेटच अमृतासाठी आयोजन केल्याबद्दल कौतुक केलं आहे. शिवाय या स्वीट कपलवर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. दोघांचाही रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना भलताच अवडलेला दिसत आहे. आता सर्वांना उत्सुकता या दोघांच्या लग्नाची लागली आहे. वाचा-अरुधंती-अनिरुद्धवर संजना ठरली भारी! 'आईपीएल'ची ट्रॉफी रुपाली भोसलेकडे अमृता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. अमृताने शालेय शिक्षण मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले येथून पूर्ण केले. आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स कॉलेजमधीन पदवीचे शिक्षण घेतेले. अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात दुहेरी या मराठी मालिकेतून केली. यानंतर तिनं ये रे ये रे या डान्स शो मध्ये भाग घेतला. त्याच वर्षी तिने स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली.
  झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava) ही नवी मालिका काही दिवसापूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक जोशी ला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. तर अमृता पवार (Amruta Pawar) हिने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून जिजाबाईंची भूमिका साकारली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या