आलिया भटसोबत काम करायला अमृता खानविलकर 'राझी'

आलिया भटसोबत काम करायला अमृता खानविलकर 'राझी'

मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अमृता आलियासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

  • Share this:

2 ऑगस्ट: आलिया भट प्रमुख भूमिकेत असलेल्या राझी या सिनेमामध्ये अमृता खानविलकरही दिसणार आहे. मेघना गुलजार यांच्या या सिनेमातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच आलिया आणि विकी कौशलची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे तर अमृता एका मुस्लिम मुलीच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे.

एक काश्मिरी मुलगी एका पाकिस्तानी ऑफिसरशी लग्न करते असं या चित्रपटाचं कथानक आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर आलियासोबत काही महत्त्वाचे सीन करणार आहे. मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अमृता आलियासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

'आलिया आजची आणि उद्याची स्टार आहे. तिच्यासोबच काम करायला मिळणं ही खूप मोठी संधी आहे'.असं अमृता  म्हणाली. तिला या सिनेमासाठी जोगी या कास्टिंग दिग्दर्शकाने निवडलंय. अमृताला  मेघना गुलजारसोबत काम करायला आवडतंय आणि ती शूट पण खूप एन्जोय करत असल्याचंही तिने सांगितलंय.

हा सिनेमा 11मे 2018ला रिलीज होणार असल्याचं करण जोहरने ट्विट करून सांगितलंय.

First published: August 2, 2017, 3:46 PM IST

ताज्या बातम्या