Home /News /entertainment /

'कोणाला आहे Filterची गरज?' अभिनेत्री Amruta Khanvilkar ने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट

'कोणाला आहे Filterची गरज?' अभिनेत्री Amruta Khanvilkar ने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट

अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

  मुंबई, 25 सप्टेंबर- अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मराठीतील एक अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री समजली जाते. अमृता आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी तशी मेहनतसुद्धा घेते. अमृताचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच इन्स्टाग्रामवर अमृताचा एक नो फिल्टर फोटो(No Filter Look) व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत तिने आपल्या सौंदर्याचं सिक्रेट सांगितलं आहे.
  अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत भरभरून प्रेम देत असतात.तिच्या सौंदर्याचं कौतुकदेखील करत असतात. नुकताच अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो नो फिल्टर फोटो आहे. फोटोमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत अमृताने म्हटला हे, 'फिल्टरची गरज कोणाला आहे, जेव्हा तुम्ही #सूर्यनमस्कार करता'. असं म्हणत अमृताने आपल्या सौंदर्याचं सिक्रेट सांगितलं आहे. यावरून अमृताने असं म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करता तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडते. फोटोसाठी तुम्हाला कोणत्याही फिल्टरची गरज भासत नाही. (हे वाचा:'ती परत आलीये' मालिकेत असे चित्रित होतात धडकी भरवणारे सीन; सेटवरील VIDEOहोतोय...) अमृता खानविलकर आपला फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी मोठी मेहनत घेत असते. ती सतत योगाद्वारे आपल्याला शरीराची काळजी घेत असते. तसेच विविध योगा आणि एक्सरसाइजचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना फिटनेस गोल देत असते. अमृताचा फिटनेस फॉलो करणारे चाहतेसुद्धा आहेत. गेली वर्षभर आपण लॉकडाऊनमध्ये पाहात होतो. लॉकडाऊनमुळे मिळालेला मोकळा वेळ अमृताने पूर्णपणे आपल्या फिटनेससाठी दिला होता. ती दररोज इन्स्टाग्रामवर आपल्या एक्सरसाइजच्या अपडेट देत होती. या सर्व मेहनतीचं फळ तिच्या चेहऱ्यावर आणि फिटनेसवर दिसून येत आहे. अमृता आत्ता आधीपेक्षाही जास्त फिट आणि सुंदर दिसून येत आहे. (हे वाचा:Amruta आणि Mrunmayeeचा कट्यार काळजात घुसवणारा नृत्यअविष्कार ; पाहा VIDEO) अमृता सध्या मराठीसोबतच हिंदीमध्येही सक्रिय झाली आहे. 'राझी' या हिंदी चित्रपटानंतर ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचं मोठं कौतुक झालं होतं. यांनतर ती हिंदी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्येसुद्धा तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. तसेच रोहित शेट्टीसोबतच इतर हिंदी कलाकारांशी तिचं उत्तम बॉन्डिंग दिसून आलं होतं. अमृताने मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या