Home /News /entertainment /

साडी नेसून बिनधास्त डान्स? बडी मुशकिल बाबा... असं वाटत असेल तर अमृता-सोनालीचा हा VIDEO पाहाच

साडी नेसून बिनधास्त डान्स? बडी मुशकिल बाबा... असं वाटत असेल तर अमृता-सोनालीचा हा VIDEO पाहाच

अमृताने तिचे बेस्ट फ्रेंड म्हणजे जवळची मैत्रीण सोनाली खरे हिच्यासोबत जबरदस्त रील तेही साडीत शेअर केले आहेत. सध्या या दोघींचे हे रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  मुंबई, 13ऑक्टोबर: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही फोटो तसेच डान्सचे तर काही फिटनेसचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच अमृताने तिचे बेस्ट फ्रेंड म्हणजे जवळची मैत्रीण सोनाली खरे (sonali khare) हिच्यासोबत जबरदस्त रील(insta reel)   तेही साडीत शेअर केले आहेत. सध्या या दोघींचे हे रील  (badi mushkil baba badi mushkil) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनाली सोबत बडी मुशकिल बाबा... बडी मुशकिल ..या गाण्यावर जबरदस्त रील शेअर केले आहे. दोघींनी या व्हिडिओमध्ये साड्या नेसल्या आहेत त्याही पलीकडे जाऊन सुपरफास्ट डान्स केला आहे. साडी नेसून डान्स कसा करायचा..हा प्रश्न आता अमृता आणि सोनालीचा हा डान्स रील पाहिल्यानंतर पडणार नाही एवढे मात्र नक्की आहे. दोघीही साडीत खूप सुंदर दिसत आहेत. जितक्या सुंदर दिसत आहेत तितकाच सुंदर डान्स त्यांनी केला आहे. त्यांचा हा हटके साडी स्टाईल डान्स चाहत्यांना देखील भलताच आवडलेला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
  यासोबतच अमृता खानविलकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनाली सोबतचे काही या साडी लुकमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये या दोघी सुंदर दिसत आहेत व मैत्रिण म्हणून त्यांच्या दोघींच्यात असलेले खासं नातं देखील दिसत आहे. अमृताने हे फोटो शेअर करत आपण दोघींनी एक रील बनवलं असल्याचं म्हटलं आहे. हा अमृताच्या अमृतकला डान्स सिरीजमधील सोनालीसोबतच पहिला डान्स व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तिने आपण फारच उत्सुक असल्याचं म्हटलं देखील आहे. या फोटोनंतर काही वेळात त्यांचे हे बडी मुशकिल बाबा... बडी मुशकिल ..या गाण्यावरचं रील समोर आलं आहे. वाचा :'सखी ग माझी'अमृताने सोनालीसोबत शेअर केले सुंदर फोटो! दोघींच्या मैत्रीचं होतंय कौतुक अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या दोघेही मराठीतल एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मात्र या दोघी जिवलग मैत्रिणी आहेत हे काही लोकांना माहिती नाही. या दोघी एकेमकांवर जीवापाड प्रेम करतात. एकमेकांना तितकंच महत्व देतात. या दोघींची ही मैत्री अनेकांना भावते. दोघींच्या मैत्रीची सोशल मीडियावरही चर्चा असते. दोघी नेहमीच एकमेकींच्या कौटुंबिक कार्यक्रमातही आवर्जून हजेरी लावतात. तसेच प्रत्येक परिस्थितीत दोघी एकेमकांसोबत खंबीरपणे उभे राहत असल्याचंही अनेकवेळा समोर आलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या