'जीवलगा'तून गायब झालेली काव्या 'या' देशात करतेय एंजॉय, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

विधी आणि निखिलमध्ये अविश्वासाची भिंत उभी करून स्वतः मात्र देश सोडून गेलेली काव्या नक्की आहे तरी कुठे याविषयी प्रेक्षकांनाही खूप उत्सुकता लागून राहीली आहे.

  • Share this:

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका जीवलगा मधील काव्या म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर मागच्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब झालेली आहे.

मालिकेतील निखिल, विधी आणि विश्वास तिघंही काव्याला शोधत असताना काव्या मात्र सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एंजॉय करताना दिसत आहे. तिने तिच्या या व्हेकेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनयासोबतच ग्लॅमरच्या दुनियेतही मराठी अभिनेत्री आता बॉलिवूड अभिनेत्रीच्या बरोबरीनं काम करणारी हॉट आणि ग्लॅमरस मराठी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तिची बेस्ट फ्रेंड सोनाली खरेसोबत सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांची आनंद घेत आहे. सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

अमृताच्या या मालदीव व्हेकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अमृता खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. तिच्या मादक अदांनी तिचे चाहते घायाळ होत आहेत.

अमृतानं मराठी सिने इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. आलिया भट आणि विकी कौशलच्या प्रमुख भूमिका असलेल्या राजी सिनेमात तिनं आलियाच्या जावेची भूमिका साकारली होती.

सध्या अमृता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका जिवलगामध्ये काव्या म्हणजेच स्वप्नील जोशी (विश्वास) च्या पत्नीची भूमिका साकरत आहे. यातील तिची व्यक्तीरेखा काहीशी नकारात्मक असली तरीही अमृतानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या सर्व फोटोमध्ये अमृता मालदीवच्या बीचवर धम्माल एंजॉय करत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

अमृतानं शेअर केलेले हे सर्व फोटो तिनं एका सीरिजसाठी शूट केले आहेत. ज्याचं नाव आहे #amuinmaldives. हे शूट ती एका हॉटेलसाठी करत असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय अमृतानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यात तिनं या फोटोशूटसाठीचा मेकअप स्वतःच केल्याचा खुलासा केला आहे.

अमृतानं तिच्या अभिनय करिअरची सुरुवात कॉमेडी एक्सप्रेस या शोमधून केली होती. त्यानंतर तिनं मराठी सिने सृष्टीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीमध्ये गणल्या जाणाऱ्या अमृतानं काही बॉलिवूड सिनेमांतही काम केलं आहे. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहे.

सध्या ती मालिकेत दिसत नसल्यानं प्रेक्षकांना तिच्या एंट्रीची उत्सुकता लागून राहीली आहे. तसेच देश सोडून गेलेली काव्या पुन्हा देशात परतेल का? आणि आल्यास ती निखिल आणि विधीला त्रास देण्यासाठी कोणती नवी योजना बनवेल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या