मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: 'तुला घाम येतो का?' या विचित्र प्रश्नावर अमृता खानविलकरनं दिलं भन्नाट उत्तर

VIDEO: 'तुला घाम येतो का?' या विचित्र प्रश्नावर अमृता खानविलकरनं दिलं भन्नाट उत्तर

अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील एक बिनधास्त आणि हटके अभिनेत्री समजली जाते. फक्त अभिनयच नव्हे तर ती आपल्या सौंदर्यांनेसुद्धा प्रेक्षकांना घायाळ करत असते.

अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील एक बिनधास्त आणि हटके अभिनेत्री समजली जाते. फक्त अभिनयच नव्हे तर ती आपल्या सौंदर्यांनेसुद्धा प्रेक्षकांना घायाळ करत असते.

अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील एक बिनधास्त आणि हटके अभिनेत्री समजली जाते. फक्त अभिनयच नव्हे तर ती आपल्या सौंदर्यांनेसुद्धा प्रेक्षकांना घायाळ करत असते.

  मुंबई, 31 जुलै-   अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील एक बिनधास्त आणि हटके अभिनेत्री समजली जाते. फक्त अभिनयच नव्हे तर ती आपल्या सौंदर्यांनेसुद्धा प्रेक्षकांना घायाळ करत असते. अमृताचं सौंदर्य पाहून एका स्त्रीने तिला असा विचित्र प्रश्न विचारला की प्रेक्षकांसह अमृतालाही हसू आवरणं कठीण झालं. मात्र या अनोख्या प्रश्नाला अमृताने आपल्या नेहमीच्या हटके पद्धतीने उत्तर दिलं आहे. वास्तविक अमृता खानविलकर एका मराठमोळ्या टीव्ही शोमध्ये पोहोचली होती. हा शो दुसरा कोणता नसून 'बस बाई बस' हा आहे. झी मराठीवर नुकतंच खास महिलामंडळीसाठी या शोची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सुबोध भावे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे. या शोमध्ये फक्त महिला सेलिब्रेटी सहभागी होत असतात. नुकतंच या शोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यांनतर आता अभिनेत्री अमृता खानविलकरने शोमध्ये हजेरी लावली आहे. दरम्यान अभिनेत्रीला एक असा प्रश्न विचारण्यात आला होता, की तो ऐकून अमृता पोट धरुन हसायला लागली. या शोमधील एका अभिनेत्रीने अमृताला विचारलं कि तुम्हाला घाम येतो का?यावर अमृता हसत-हसत उत्तर देते तू हा मला प्रश्न विचारलंस हे तर ठीक आहे. पण नंतर यावर मिम्स किती तयार होणार याची तुला कल्पनासुद्धा नाहीय. त्यांनतर अमृता पुढे म्हणाली, अभिनेत्री असले तरी मी एक माणूस आहे. आणि निश्चितच मलासुद्धा घाम येतो. पण शूटिंगदरम्यान सेटवर मी माझासोबत एक छोटा फॅन सोबत ठेवते. जेणेकरून मला कमीत कमी घाम येईल याची मी काळजी घेते. आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणहून या मुंबईमध्ये आल्यांनतर तुम्हाला उष्णतेची जाणीव होतेच'.
  (हे वाचा:बालीचं हे अप्रतिम सौंदर्य तुम्हालाही करेल आकर्षित; मराठमोळ्या सई लोकूरने शेअर केले ट्रिपचे एकापेक्षा एक फोटो ) अमृता खानविलकरच्या कामाबाबत सांगायचं झालं तर, ती नुकतंच 'चंद्रमुखी' या चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट आणि यातील गाणी प्रचंड हिट ठरली आहेत. या चित्रपटातील 'चंद्रा' हे गाणं आणि अमृता खानविलकरचा डान्स तुफान लोकप्रिय झाला होता. या गाण्यावर अनेक व्हिडीओ आई रील्स बनवण्यात आले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या