मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Navratri 2021:अमृता खानविलकरने 'रामलीला'च्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स;अस्सल गुजराती लूकमध्ये दिसली अभिनेत्री

Navratri 2021:अमृता खानविलकरने 'रामलीला'च्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स;अस्सल गुजराती लूकमध्ये दिसली अभिनेत्री

आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण आहे.कलाकार असो किंवा सर्वसामान्य लोक सर्वांनाच देवी आईच्या भक्तीची ओढ लागली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 7ऑक्टोबर- अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) आपल्या खास अंदाजात दुर्गा मातेला वंदना केली आहे. अमृताने देवी मातेला नृत्यवंदना दिली आहे. नुकताच अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती 'नगाडे संग ढोल बाजे' य गाण्यावर अप्रतिम डान्स (Dance Video) करताना दिसत आहे.
आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण आहे.कलाकार असो किंवा सर्वसामान्य लोक सर्वांनाच देवी आईच्या भक्तीची ओढ लागली आहे. आज प्रत्येक घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. सर्वजण आईची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येक लोक आपल्या कलेतून आपल्या दुर्गामातेला वंदन करत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या नृत्य कलेतून आईचं जंगी स्वागत केलं आहे. अमृताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. (हे वाचा:Navratri Spl Song: बॉलिवूडच्या 'या' गाण्यांशिवाय अपूर्ण आहे ... ) या व्हिडीओमध्ये अमृता खानविलकर संजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला'चित्रपटातील आणि अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणवर चित्रित करण्यात आलेल्या 'नगाडे संग ढोल बाजे' या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये अमृताने अगदी चनिया-चोळी घालून अगदी गुजराती लूक केला आहे. अमृताला या डान्समध्ये साथ दिली आहे. डान्सर प्रथमेश आणि जितेश यांनी. हे तिघेही अप्रतिम डान्स स्टेप्स करताना दिसून येत आहेत. नवरात्रोत्सव सर्व लोकांचा आवडता सण असतो. मूळचा गुजरातचा असणारा हा सण अलीकडे महाराष्ट्रातही अगदी उत्साहात साजरा केला जातो. (हे वाचा:VIDEO:अंतरा सोडणार मल्हारचं घर? 'जीव माझा गुंतला' मालिकेत येणार नवं वळण) हा सण महिलांसाठीही खूपच खास असतो. कारण देवीच्या भक्तीसोबतचं स्त्रियांना नटायला देखील मिळतं. पूजा उपवाससोबत महिला ९ दिवस ९ रंगाच्या साड्या नेसतात. तसेच नवरात्रोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गरबा आणि दांडिया होय. या सणाच्या पार्शवभूमीवर सर्व लोक मोठ्या उत्सहात दांडिया आणि गरबा खेळत असतात. यासाठी लोकगीतांसह अनेक बॉलिवूड गाणीही प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक गाणं म्हणजे 'नगाडे संग ढोल बाजे' होय. याचं गाण्यावर अमृता जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Navratri

पुढील बातम्या