मुंबई, 08 डिसेंबर : चंद्रा बनून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. चंद्रमुखीनंतर अमृताची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली आहे. सोशल मीडियावर रील्स, फोटो अमृता शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. गेली अनेक दिवस अमृता चंद्रमुखीमुळे आणि त्यानंतर अमृता झलक दिखलाजा सीझन 10 मुळे चर्चेत राहिली. अमृताला फॉलो करणाऱ्या आणि ट्रोल करण्यांची संख्याही तितकीच आहे. मात्र ती कधीच ट्रोलिंगकडे लक्ष देताना दिसली नाहीये. पण नुकतीच अमृतानं एक पोस्ट शेअर केली आणि त्यावर आलेल्या एका युझरच्या कमेंटनं अमृता चांगलीच भडकली. तिनं थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिली आहे. अमृतानं इतकं मोठं पाऊल का उचललं जाणून घ्या.
चंद्रमुखी सिनेमावेळी अमृताला अमाप प्रेम मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रानं तिला डोक्यावर घेतलं. तिच्या गाण्याची, नाचाची आणि अभिनयाची सर्वांनी दखल घेतली. तर दुसरीकडे झलक मध्ये आल्यानंतरही अमृताला खूप प्रेम मिळालं. धकधक गर्ल माधुरी दीक्षितबरोबर थिरकायची आणि तिच्यासमोर नाचयाची संधी तिला मिळाली. मात्र अमृता शोमधून आऊट झाल्यानंतर सगळ्यांना नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे काही प्रमाणात अमृताला ट्रोल देखील केलं. पण यावेळी मात्र अमृतानं ट्रोलर्सच्या चांगलीच चपकार लगावली आहे.
हेही वाचा - Rohit Shinde: बिग बॉसमधून आऊट झालेला डॉ. रोहित शिंदे नक्की कोणता डॉक्टर आहे? समोर आल्या डिटेल्स
नुकतीच दत्त जयंती झाली. यानिमित्तानं अनेक जण दत्तगुरूंचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत होते. अमृता कितीही मॉडर्न असली तरी देवावार तिची नितांत श्रद्धा आहे. अमृतानं गुरूचरित्रातील काही ओळी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यावरून तिची देवावरची श्रद्धा दिसली मात्र काहींनी तिला वाईट शब्दांत ट्रोल देखील केलं.
अमृतानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'दोन वर्णाचा गुरू हा शब्द चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारा आहे. गुरू हाच माता व पिता आहे.तसाच परम शिव आहे. शिव कोपला तर त्याचे रक्षण गुरू करेल पण गुरू कोपला तर शिवही त्याचे रक्षण करू शकणार नाही. ईश्वर प्रसन्न झाला तर त्याची ओळख पटविणेसाठी गुरू पाहिजे पण गुरू प्रसन्न असेलस ईश्वर त्याचे अधीन असतो. गुरू कुठेही शास्त्राचा अर्थ, तीर्थ, व्रते, योग, तप आदिचे ज्ञान प्राप्त होते'.
अमृताच्या या पोस्टवर एका युझरनं कमेंट करत म्हटलं, 'गुरूचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची, शरिर दाखवणाऱ्यांनी याबद्दल बोलु नये'. त्यावर अमृतानं युझरला चांगलेच खडे बोल सुनावले. अमृतानं म्हटलं, 'कोण तुम्ही. असल्या भाषेत परत बोललात तर पोलिसांत तक्रार करेन कळलं? या बाबतीत कोणाचं उगीच ऐकून घेणार नाही'. अमृताबरोबर झालेल्या या प्रकाराचा एक स्क्रिन शॉर्ट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.