मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Amruta Khanvilkar : चंद्रमुखीच्या भूमिकेला छेद देण्यासाठी अमृता सज्ज! प्रजासत्ताक दिनी अभिनेत्रीची मोठी घोषणा

Amruta Khanvilkar : चंद्रमुखीच्या भूमिकेला छेद देण्यासाठी अमृता सज्ज! प्रजासत्ताक दिनी अभिनेत्रीची मोठी घोषणा

amruta khanvilkar

amruta khanvilkar

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमृता खानविलकरनं मोठी घोषणा केली आहे. चंद्रमुखी भूमिकेला छेद देण्यासाठी अमृता सज्ज झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी: चंद्रमुखी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजपर्यंत अमृतानं केलेल्या सगळ्या भूमिकांना छेद देणारी अशी तिची नवी भूमिका पाहायला मिळणार आहे. अमृता खानविलकर पहिल्यांदा बायोपिकमध्ये काम करणार आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबरची भूमिका अमृता खानविलकर साकारणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

ललिता बाबरनं आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा 'ललिता शिवाजी बाबर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर 'ललिता शिवाजी बाबर' या सिनेमाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत.  ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे.   पुढील वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय पर्यटन दिनी सईची गुड न्यूज! जागतिक पातळीवर करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व

'चंद्रमुखीची कात टाकून आता हि नवी कात ओढण्याची वेळ. नव्या वर्षाचं नवं स्वप्नं .... नवं धाडस ... नवी परीक्षा एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या राष्ट्राचेच नाही तर देशाचे हि नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. हे शिवधनुष्य मी एक अभिनेत्री म्हणून तर उचलं आहेच पण ह्या वेळीस जबाबदारी मोठी आहे. तुमची साथ तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या', असं म्हणत अमृतानं ही गुड न्यूज दिली आहे.

'ललिता बाबर' यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ''एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’’

एंडेमॅालचे शाईन इंडियाचे गौरव गोखले म्हणतात, अमृतासारखी गुणी अभिनेत्री ही भूमिका साकारतेय, म्हणजे ‘ललिता शिवाजी बाबर’ला शंभर टक्के न्याय मिळणार, हे नक्की. अमृता मुळात खिलाडू वृत्तीची असल्याने ही भूमिका ती योग्यरित्या साकारेल, याची खात्री आहे.’’

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news