• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • तब्बल 7 वर्षानी Amruta आणि Mrunmayee चा कट्यार काळजात घुसवणारा एकत्र नृत्याविष्कार; पाहा VIDEO

तब्बल 7 वर्षानी Amruta आणि Mrunmayee चा कट्यार काळजात घुसवणारा एकत्र नृत्याविष्कार; पाहा VIDEO

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar )आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) या दोघींचा नृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या दोघीही ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kaljat Ghusli) या सिनेमातील प्रसिद्ध गाणं ‘सुर निरागस हो’ यावर थिरकताना दिसत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर 2021 ;मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे  (Mrunmayee Deshpande) या दोघींचा नृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या दोघीही ‘कट्यार काळजात घुसली’  (Katyar Kaljat Ghusli) या सिनेमातील प्रसिद्ध गाणं ‘सूर निरागस हो’  यावर थिरकताना दिसत आहेत. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट 7 वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटात अमृता आणि मृण्मयी या दोघींच्या भूमिका होत्या. मृण्मयी देशपांडेने हा सुंदर व्हिडिओ इन्स्टावर शेअर करत म्हटले आहे की, सूर निरागस हो.. उमा आणि झरीना ७ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतात! या नृत्याच्या निमित्ता या दोघी एकत्र आल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र अनारकलीत नटलेल्या दोघी आणि त्यांचा सुरेख पदन्यास असलेला हा व्हिडियो प्रेक्षकांना खूपच आवडतो आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या या नृत्याचे कौतुक केले आहे. वाचा : 'आम्ही अजून लग्न नाही केलं...' म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा केला खुलासा मृण्मयी देशपांडे एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. त्याचाच प्रत्यय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येत आहे. यासोबतच मृण्मयी देशपांडे उत्तम गाते देखील. ती अधून मधून बहिणीसोबत काही गायनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मृण्मयीची धाकटी बहीण गौतमी देशपांडेसुद्धा चांगली गाते. 'माझा होशील ना'मधून तिने लोकप्रियता मिळवली आहे.
  View this post on Instagram

  Shared post on

  Fam (Official Site) embed instagram post on CBS All Access
  अमृता खानविलकर 'अमृत कला'च्या माध्यमातून विविध नृत्याविष्कार समोर घेऊन येते आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या अमृताची उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. याच नृत्यप्रेमाचं रुपातंर करत 'अमृत कला'च्या माध्यमातून अमृता नृत्य सादरीकरण करतेय. तिच्या या उपक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: