मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं 'शिवतांडव स्तोत्र' रिलीज, काही तासांत मिळाले इतके लाख व्ह्यूज

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं 'शिवतांडव स्तोत्र' रिलीज, काही तासांत मिळाले इतके लाख व्ह्यूज

Amruta Fadnavis's Shiv Tandav song: अमृता फडणवीस यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' झालं रिलीज

Amruta Fadnavis's Shiv Tandav song: अमृता फडणवीस यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' झालं रिलीज

Amruta Fadnavis's Shiv Tandav song: अमृता फडणवीस यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' झालं रिलीज

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 फेब्रुवारी-  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस   (Devendra Fadnavis)  यांच्या पत्नी अमृता फडणवीस   (Amruta Fadnavis)  या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकवेळा त्या वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत आल्या आहेत. परंतु आज त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे हे सर्वांनाच माहिती आहे. याआधीही त्यांना गाणी गाताना ऐकलं आहे. त्यांची काही गाणीही रिलीज झाली आहेत. आजसुद्धा अमृता फडणवीस एका नव्या गाण्यासह सर्वांच्या भेटीला आल्या आहेत. हे गाणं खरं तर 'शिव तांडव स्तोत्र' आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज हे गाणं रिलीज झालं आहे. यामध्ये अमृता फडणवीस एका साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हणताना दिसून येत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. तर शैलेश दानी या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत. चार तासांपूर्वी हे गाणं रिलीज झालं आहे. दरम्यान याला पाच लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

याआधी अमृता फडणवीस यांनी गणेशोत्सवात एक गाणं रिलीज केलं होतं. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील नद्यांवरही एक गाणं गायिलं आहे. तसेच त्यांचं 'तिला जगू द्या' हे सुद्धा गाणं विशेष चर्चेत आलं होतं.

" isDesktop="true" id="672313" >

'किचन कल्लाकार' मध्ये हजेरी-

अमृता फडणवीस या नुकतीच झी टीव्हीवरील लोकप्रिय शो 'किचन कल्लाकार' मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी इतर पाहुण्या कलाकरांसह मोठी धम्म्माल केली होती. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांना पंगतीतील कोणता पदार्थ जास्त आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळी फार आवडते. आणि एका पंगतीत ते 30 ते 35  पुरणपोळ्या सहज खातात. यांनतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलदेखील केलं होतं.

First published:

Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis, Entertainment