मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Amruta Fadnavis: सारे जहाँ से अच्छा! प्रजासत्ताक दिनी अमृता फडणवीसांचं प्रेक्षकांना सरप्राईज, Video Viral

Amruta Fadnavis: सारे जहाँ से अच्छा! प्रजासत्ताक दिनी अमृता फडणवीसांचं प्रेक्षकांना सरप्राईज, Video Viral

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस

आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यामुळे अमृता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 26 जानेवारी- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्या 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यात अमृतांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता. दरम्यान आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यामुळे अमृता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत काही ना काही पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असतात. आज त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अमृतांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतंच एक पोस्ट शेअर करत मोठं सरप्राईज दिलं आहे. चाहत्यांना हे सरप्राईज फारच पसंत पडत आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर हे सरप्राईज मिळाल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.

(हे वाचा: Rinku Rajguru: रिंकू राजगुरुला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? अभिनेत्रीने अखेर सांगितली मन की बात)

अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या नव्या गाण्याचा ट्रेलर आहे. अमृता फडणवीस यांनी आगामी बहुभाषिक 'भारतीयन्स' या चित्रपटातील 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा'हे गाणं गायलं आहे. या गाण्यातील बोल ऐकून अंगावर शहारा आल्याशिवाय राहात नाही. अमृता फडणवीस यांच्या या देश भक्तीपर गीताला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. अमृता यांनी ट्रेलर रिलीज करत संपूर्ण गाण्याची लिंकसुद्धा शेअर केली आहे.

अमृता यांनी पोस्टमध्ये लिहलंय, 'तुम्हाला #republicday2023 च्या खूप खूप शुभेच्छा!आगामी बहुभाषिक चित्रपट 'भारतीयन्स' साठी 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे देशभक्तीपर गाणे गाणं हा मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचं अंगावर शहारा आणणारं हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवं'. असं म्हणत अमृता यांनी या गाण्याची माहिती दिली आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्या विविध गाण्यांवर रिल्ससुद्धा बनवताना दिसून येतात. नुकतंच त्या आपल्या 'आज मैंने मूड बना लिया हैं' या गाण्यात झळकल्या होत्या. हे गाणं बॅचलर पार्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित होतं.

First published:

Tags: Amruta fadnavis, Entertainment