मुंबई, 15 जुलै: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. एका राजकारण्याची बिनधास्त पत्नी म्हणून अमृता फडणवीस यांची ओळख आहे. एक बँकर, राजकारण्याची पत्नी ते गायिका असा त्यांचा प्रवास सर्वांना पाहिला आहे. अमृता फडणवीसांनी त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलंय. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन सज्ज झाल्या आहेत. 'वो तेरे प्यार का गम' या त्यांच्या नव्या गाण्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लवकरचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीसांचं हे पहिलंच गाणं आहे.
'वो तेरे प्यार का गम' अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्याचं पहिलं वहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालंय. अमृता फडणवीसांनी स्वत: पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये एक पोस्ट देखील त्यांनी शेअर केली आहे. त्यांनी म्हटलंय, 'लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना… लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना …!' त्याचप्रमाणे अमृता फडणवीसांनी सारेगम या म्युझिक कंपनीचे आभार देखील मानले आहेत.
View this post on Instagram
अमृता फडणवीसांनी आजवर अनेक वेगळ्या धाडणीची गाणी प्रेक्षकांसमोर आणली आहेत. तसेच प्रत्येक गाण्यात त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. यावेळी अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातून गोल्डन मेलोडी पाहायला मिळणार आहे. अमृता फडणवीस यावेळी 'वो तेरे प्यार का गम हे' हे 'माय लव्ह' या 1970मध्ये आलेल्या सिनेमातील गाणं रिक्रिएट करणार आहे. तेव्हा हे गाणं अभिनेते शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यवर चित्रीत करण्यात आलं होतं.
अमृता फडणवीस यांनी याआधी हटके गाण्यांनी प्रेक्षाकांना वेड लावलं. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे मात्र अमृता फडणवीस नेहमीच त्याच जोशात नवं गाणं प्रेक्षकांसमोर घेऊन आल्या आहेत.
अमृता फडणवीसांनी या आधी 'शिवतांडव', 'तेरी बन जाऊंगी अकॉस्टिक', 'ये नयन डरे डरे', 'मोरया रे', 'बेटिया प्राइड ऑफ नेशन', 'सड्डी गल्ली रेल गड्डी', 'कुणी म्हणाले', 'तिला जगूद्या', 'पेटूनी उठू दे आज', अशी अनेक हिट गाणी केली आहेत. त्यांचं नवं गाणं कसं असेल आणि आता त्या कोणत्या अवतारात दिसणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis