Home /News /entertainment /

‘कुणी म्हणालं वेडी कुणी म्हणालं खुळी’; अमृता फडणवीस घेऊन येतायेत नवं गाणं

‘कुणी म्हणालं वेडी कुणी म्हणालं खुळी’; अमृता फडणवीस घेऊन येतायेत नवं गाणं

सामाजिक कार्यांसोबतच अमृता फडणवीस गायन क्षेत्रातही प्रचंड सक्रिय आहेत. त्यांचं एक नवं गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच त्यांनी या आगामी गाण्याची घोषणा केली. (Amruta Fadnavis New Song)

    मुंबई 5 मार्च: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. गेल्या काही काळात त्या सामाजिक कार्यांसोबतच गायन क्षेत्रातही प्रचंड सक्रिय आहेत. दरम्यान त्यांचं एक नवं गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. अमृत फडणवीस यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी गाण्याची घोषणा केली. (Amruta Fadnavis New Song) या नव्या गाण्याचं नाव त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. परंतु त्या गाण्यातील एक कडवं मात्र त्यांनी पोस्ट केलं आहे. “जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही !” असं ट्विट करुन त्यांनी या गाण्याची घोषणा केली. लक्षवेधी बाब म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं येत्या 8 मार्च रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातून माध्यमातून त्या महिलांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं होतं. अवश्य पाहा - Valentine's Week मध्ये अमृता फडणवीसांचा RED Look जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो? जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. (International Women’s Day) असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या जागतिक दिनाचं निमित्त साधून अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन येत आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis, Entertainment, Womens day

    पुढील बातम्या