अमृता फडणवीसांच्या ट्वीटनंतर अखेर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीचं Twitter केलं अनब्लॉक

‘मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केलं... मुंबई पोलिसांच्या या पक्षपातानंतर तर मला भारतात राहायला भीती वाटत आहे.’ असं ट्वीट केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 07:20 PM IST

अमृता फडणवीसांच्या ट्वीटनंतर अखेर मुंबई पोलिसांनी पायल रोहतगीचं Twitter केलं अनब्लॉक

मुंबई, 11 जुलै- सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री पायल रोहतगीने मुंबई पोलिसांनी तिला ट्विटरवर ब्लॉक केल्याचं म्हटलं होतं. पायलने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा स्क्रीन शॉट शेअर करत, ‘मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केलं... मुंबई पोलिसांच्या या पक्षपातानंतर तर मला भारतात राहायला भीती वाटत आहे.’ असं ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅग केलं होतं. पायलने शहा यांना यासंदर्भात ईमेलही केला होता.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत म्हटलं की, 'एखादा नागरिक सोशल मीडियावर जर त्याचं मत व्यक्त करत असेल, (आणि ज्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नसतील ) अशा नागरिकाला कोणत्याही सार्वजनिक संस्थेने ब्लॉक करता कामा नये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं.' यानंतर मुंबई पोलिसांनीही आपलं स्पष्टीकरण देत म्हटलं की, 'प्रत्येक नागरिकाच्या पाठिशी मुंबई पोलीस नेहमीच उभं राहिलं आहे. पायल रोहतगीचं अकाउंट सुरू असून, आम्ही कोणत्याही मुंबईकराशी कधीच संवाद तोडत नाही. दरम्यान, आमची टीम नक्की काय झाले याचा शोध घेत आहे.'

Loading...

याप्रकरणी पायलने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ईमेल केला. यात तिने लिहिले की, ‘हॅलो अमित शहा सर, आशा व्यक्त करते की सर्व काही चांगलं असेल. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमा मागते. पण आज सकाळी मला माझ्या ऑफिसमधून कळलं की, मुंबई पोलिसांनी माझं वेरिफाइट अकाउंट ब्लॉक केलं आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकासोबत असं होणं हे माझ्यासाठी फार धक्कादायक आहे.’

एवढंच नाही तर पायलने पुढे लिहिले की, ‘एजाज खान नावाच्या अभिनेत्याने एका व्हिडिओत माझ्या विरोधात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केले. या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. पण आता तुम्हीच या प्रकरणात लक्ष घालावं अशी मी आशा करते.’ पायलने या मेलसोबत तिच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आलेली एक लिंकही शेअर केली.

पराभवानंतर कोहलीवर भडकला अभिनेता, म्हणाला- 'सोडून दे कॅप्टन्सी'

Sand Ki Aankh Teaser: घरच्यांवरच गोळी चालवणाऱ्या तापसी- भूमीचा अॅक्शनपॅक्ड स्वॅग

अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं

बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...