अजून एक गाणं आणणार; अमृता फडणवीस म्हणतात, “ट्रोलर्सचं स्वागत..."

अजून एक गाणं आणणार; अमृता फडणवीस म्हणतात, “ट्रोलर्सचं स्वागत...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis ) यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. ट्रोल झाल्यानंतर निराश व्हायला होतं का या प्रश्नावर त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वीच 'तिला जगू द्या' या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. आता गुरुवारी (17 डिसेंबर) त्यांचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी दिली आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

अमृता फडणवीस यांची ओळख फक्त देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून नाहीये. त्या स्वत: एक बँकर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या आहेत तसंच राजकारणातील घडामोडींकडेही त्यांचं लक्ष असतं. ट्विटवरुन त्या आपली मतं प्रदर्शित करत असतात.

ट्रोल होतात तेव्हा काय वाटतं?

अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर आजपर्यंत अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे माझ्या आयुष्यातलेच चढ उतारांचे भाग आहेत आणि हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो.’

अमृता फडणवीस पुढे म्हणाला, ‘मी लहानपणापासून गाणं शिकत आहे. त्यामुळे मला माझ्या क्षमता माहित आहेत. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला माहित आहे.’ T-series च्या मराठी या युट्यूब अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला लाईक्स पेक्षा डिस्लाईक जास्त असल्यानेही त्या ट्रोल झाल्या होत्या.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 14, 2020, 7:05 PM IST

ताज्या बातम्या