• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिला का हा VIDEO?

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिला का हा VIDEO?

गणेशोत्सवापूर्वी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित होणार होता. त्यानुसार आज त्यांचं गणेश वंदनेचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 सप्टेंबर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील त्या विशेष सक्रीय आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे देखील अमृता फडणवीस विशेष चर्चेत असतात. दरम्यान अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांचे चाहते या गाण्याच्या प्रतीक्षेत होते. गणेशोत्सवापूर्वी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित होणार होता. त्यानुसार आज आज 03 सप्टेंबर रोजी त्यांचा व्हिडीओ (Amruta Fadnavis New Song Launch) प्रदर्शित झाला आहे.  गणेश वंदना (Ganesh Vandana by Amruta Fadnavis) या नावाने हा व्हिडीओ लाँच करण्यात आला आहे. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यमातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांच्या गाण्याप्रमाणेच चर्चा असते ती त्यांच्या लुकची. या गाण्यामध्ये त्या पारंपरिक मराठमोळ्या रुपात दिसत आहेत. नथ आणि नऊवारीमध्ये त्यांचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. गणेश पूजेचं हे गाणं असणार आहे. अमृता फडवणीस यांची आधी प्रदर्शित झालेली गाणी व्हायरल झाली होती. त्यामुळे आता या गाण्याला देखील कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यामध्ये एका डॉक्टरच्या भूमिकेत अमृता फडणवीस दिसत आहेत. 'भक्तीचे दुसरे नाव सेवा' असं म्हणत डॉक्टरांच्या सेवेची जाण ठेवणारा हा व्हिडीओ आहे. याआधी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त एक इंग्रजी गाणं देखील प्रदर्शित केलं होतं. त्यावेळी त्यांचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीचं हे गाणं त्यांनी त्यांच्या आवाजात प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांची ‘ये नयन डरे डरे’ , ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ ही गाणी देखील विशेष गाजली होती. अमृता यांच्या गाण्यांनी जेवढं कौतुक मिळवलं तेवढंच त्यांना ट्रोलिंगची देखील शिकार व्हावं लागलं आहे. दरम्यान आज प्रदर्शित झालेल्या नव्या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: