बिग बींसोबत अमृता फडणवीस यांचं 'फिर से' गाणं रिलीज

बिग बींसोबत अमृता फडणवीस यांचं 'फिर से' गाणं रिलीज

उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या स्वप्नांवर विश्वास असला की ती स्वप्न पूर्ण होतात अशा आशयाचं हे गाणं मुंबईच्या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रित करण्यात आलं.

  • Share this:

01 जून : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं 'फिर से' नुकतंच प्रदर्शित झालं.या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं.विशेष म्हणजे या गाण्यात अमृता फडणवीस यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी स्वत: काम केलंय.

या सोहळ्याला गाण्याचे दिग्दर्शक अहमद खान, संगीतकार जीत गांगुली, रचनाकार रश्मी विराग, अरेंजर अभिजीत वाघानींसोबत टी सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार उपस्थित होते.

उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या स्वप्नांवर विश्वास असला की ती स्वप्न पूर्ण होतात अशा आशयाचं हे गाणं मुंबईच्या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रित करण्यात आलं. अमृता फडणवीस यांनी बिग बींसोबत केलेला परफाॅर्मन्स विशेष गाजला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 06:25 PM IST

ताज्या बातम्या