
बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत आलेल्या अनेक कलाकारांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलंय. यात काहींची लग्न सक्सेस झाली तर काही जणांचं नातं संपुष्टात आलं. पहिल्या लग्नातून विभक्त झालेल्या अनेकांनी आपला नवा संसार धाटला पण काहींना या घटस्फोटानं मनात इतका मोठा आघात केला की ते कलाकार आजही सिंगल आयुष्य जगत आहेत. यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा सर्वाधिक समावेश आहे.

अभिनेत्री अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. दोघांचं लग्न
वर्ष टिकलं. दोघांना सारा आणि इब्राहम अली खान अशी दोन मुलं आहेत.

घटस्फोटानंतर सैफनं करीनाबरोबर दुसरं लग्न केलं. पण अमृतानं मात्र सिंगल मदर बनून दोन्ही मुलांना मोठं केलं.

कपूर घराण्यातील पहिली अभिनेत्री करिश्मा कपूरचा अभिषेक बच्चनबरोबर साखरपुडा मोडला. त्यानंतर
2003मध्ये तिनं बिझनेसमन असलेल्या संजय कपूरबरोबर लग्न केलं. त्यांचं नातं 2016मध्ये संपुष्टात आलं.

करिश्माबरोबर घटस्फोटानंतर संजयनं आता तिसरं लग्न केलं आहे. पण करिश्मा आजही सिंगल असून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे.

अभिनेत्री संगीता बिजलानीचं नाव अभिनेता सलमान खानबरोबर जोडलं गेलं होतं. दोघांचं लग्नही होणार होतं.

सलमानबरोबरच्या ब्रेकअप नंतर संगीतानं क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीनबरोबर लग्न केलं. पण काही वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला असून संगीतनं आजवर दुसरं लग्न केलेलं नाही.

अभिनेत्री मनीषा कोईरालानं नेपाळी बिझनेसमन सम्राट दहलबरोबर लग्न केलं होतं.

2 वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मनीषा आजही एकट्यानं जीवन जगत आहे.

करिअरमध्ये प्रसिद्धी मिळवत असताना अभिनेत्री महिमा चौधरीनं आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीबरोबर लग्न केलं.

दोघांना मुलगी झाली आणि काही महिन्यात त्यांनी नात्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर आजपर्यंत महिमा एकट्यानं तिच्या मुलीला मोठं करत आहे.

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दोघांचं ओसंडून वाहणारं प्रेम एकदिवशी आटलं आणि दोघांनी वेगळं होण्याचं निर्णय घेतला. घटस्फोटानंतर कोंकणा सेननं आजवर लग्न केलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.