Wat'er Are U Saying; अम्रिता रावचं ‘ते’ दृश्य रोनाल्डोमुळं होतंय व्हायरल

जल पिजिए...; अम्रिताच्या त्या दृश्याची तुलना होतेय रोनाल्डोच्या कोकाकोला प्रकरणाशी

जल पिजिए...; अम्रिताच्या त्या दृश्याची तुलना होतेय रोनाल्डोच्या कोकाकोला प्रकरणाशी

  • Share this:
    मुंबई 18 जून: पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्या. शिवाय त्यानं असे कोल्डडिंक्स घेण्याऐवजी पाणी प्या असा इशारा केला. या चकित करणाऱ्या प्रकराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या रोनाल्डोच्या याच कृतीची चर्चा आहे. सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अम्रिता राव हिनं देखील एक अनोखी रिअक्शन दिली आहे. विवाह या चित्रपटात अम्रितानं जल लिजिये असं म्हणत शाहिद कपूरला पाणी दिलं होतं. त्या दृश्याची तुलना सध्या रोनाल्डोच्या कोकाकोला प्रकाराशी केली जात आहे. अम्रितानं देखील विवाह चित्रपटातील तो मिम शेअर कर आपली गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोण होतीस तू काय झालीस तू! चाळीत राहणारी ही तरुणी ‘Bigg Boss’मुळं झाली सेलिब्रिटी यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं त्याने पाहिलं. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणत एकाप्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं. ‘मला Coronavirus चिडवतात’; बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव रोनाल्डोची ही एक कृती कोका कोला कंपनीला मोठी महागात पडली असून शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि तब्बल चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. कंपनीची किंमत २४२ बिलियन डॉलर्सवरुन २३८ वर आली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: