ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, Baby Bump चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, Baby Bump चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री अमृता राव (Amruta Rao) आणि आरजे अनमोल पहिल्यांदा आईबाबा होणार आहेत. डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर क्लिक झालेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावचं वैयक्तिक आयुष्य तसं फारसं चर्चेत नसते. ती नेहमी तिचं खाजगी आयुष्य स्वत:पुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान सध्या अमृताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या या  फोटोमध्ये ती  Baby Bump फ्लाँट करत आहे. यामध्ये ती तिचा नवरा आरजे अनमोल (RJ Anmol) बरोबर एका क्लिनिक बाहेर दिसत आहे. अभिनेत्री अमृता राव (Amruta Rao) आणि आरजे अनमोल पहिल्यांदा आईबाबा होणार आहेत. एका डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर दोघांचा हा फोटो क्लिक झाला आहे. अमृताने गेल्या काही महिन्यांपासून तिच्या प्रेग्नन्सीची बातमी माध्यमांपासून दूर ठेवली होती.

अमृता आणि अनमोल यांनी 2016 मध्ये लग्न केलं. त्याआधी 7 वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. त्यांचा लग्नसोहळा देखील खूप खाजगी होता. अशाचप्रकारे दोघांनी प्रेग्नन्सीबाबत देखील जाहीर केले नाही नव्हते.

(हे वाचा-15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार विवेक ऑबरॉय स्टारर मोदींचा बायोपिक)

View this post on Instagram

Happy Anniversary My Soulmate 💫 My Lifeline @rjanmol27 ❤️ 4 years of Marital BLISS 🙏

A post shared by AMRITA RAO🇮🇳 (@amrita_rao_insta) on

या अहवालात असे म्हटले आहे की अमृताच्या जवळच्या व्यक्तींपैकी असणाऱ्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'तिच्या आयुष्यातील हा टप्पा तिला आवडत आहे. जे या कपलच्या जवळचे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त या प्रेग्नन्सीविषयी कुणाला ठावूक नाही आहे. अनमोल आणि अमृता त्यांच्या वैयक्तिक गोष्टी खाजगी ठेवणेच पसंत करतात.'

(हे वाचा-नेहा कक्करने गाण्यातून दिली लग्नासाठी तयार असल्याची खूशखबर! काय म्हणाली पाहा)

यापूर्वी तिच्या सिक्रेट वेडिंगबद्दल IANS शी बोलताना अमृता असे म्हणाली होती की, 'आमच्या आनंदी नात्याची ती 7 वर्ष होती आणि माझा सोलमेटच 'लाइफ पार्टनर' असल्याने मी खूप नशिबवान आहे. फक्त कुटुंबीयांबरोबर आमचा छोटेखानी लग्नसोहळा पार पडला.'

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2019 मध्ये अमृता राव शेवटचे 'ठाकरे' या सिनेमात दिसली होती. त्यामध्ये तिने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित होता. अमृताने यामध्ये मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 13, 2020, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading