शाहरूखला चंदेरी दुनियेत आणणारे दिग्दर्शक लेख टंडन काळाच्या पडद्याआड

शाहरूखला चंदेरी दुनियेत आणणारे दिग्दर्शक लेख टंडन काळाच्या पडद्याआड

1988 मध्ये 'दिल दरिया' या टिव्ही मालिकेसाठी टंडन यांनी शाहरुखला पहिल्यांदा संधी दिली होती

  • Share this:

16 आॅक्टोबर : 'दुल्हन वही जो पिया मन भाएँ' आणि 'आम्रपाली' सारख्या दर्जेदार चित्रपटांची मेजवानी रसिकांना देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते लेख टंडन यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतच त्यांच्या पारि्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

किंग खान अर्थात शाहरुख खानला या चंदेरी दुनियेत आणण्याचं श्रेय हे लेख टंडन यांना जातं. 1988 मध्ये 'दिल दरिया' या टिव्ही मालिकेसाठी टंडन यांनी शाहरुखला पहिल्यांदा संधी दिली होती. गेल्या काही वर्षात त्यांनी शाहरुख खान बरोबर चेन्नई एक्स्प्रेस, स्वदेस, पहेली तर अमिर खानसोबत रंग दे बसंती, अजय देवगणच्या बरोबर हल्लाबोल या चित्रपटात कामही केलं होतं. लेख टंडन यांनी उत्तरायण, खुदा कसम, जहां प्यार मिले आणि प्रिंस, खद्दार अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. तर काही टिव्ही मालिकांमध्येही चंडन यांनी काम केलं होतं.

टंडन यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1929 मध्ये लाहोरमध्ये झाला होता. पृथ्वीराज कपूर यांच्या प्रेरणेने त्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. लेख टंडन यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

First published: October 16, 2017, 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading