Home /News /entertainment /

"मराठी स्वाभिमानाचा अंगार..."; अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

"मराठी स्वाभिमानाचा अंगार..."; अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

डाॅ. अमोल कोल्हे (amol kolhe latest news)यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. सध्या या टीझरनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असून याचीच चर्चा सुरु असलेली दिसत आहे.

  मुंबई, 26 जून : शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकांमधून आपल्या अभिनयाची वेगळी अशी छाप सोडणारे डाॅ. अमोल कोल्हे (Dr. amol kolhe) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात. ते नेहमीच काही ना काही पोस्ट करत सगळ्यांचं लक्ष वेधत असतात. अशातच डाॅ. अमोल कोल्हे (amol kolhe latest news)यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. सध्या या टीझरनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असून याचीच चर्चा सुरु असलेली दिसत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap garudjhep movie teaser out)हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर कोल्हे यांनी आज सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत डाॅ. कोल्हे  यांनाी म्हटलं की, मराठी स्वाभिमानाचा अंगार.. काल, आज आणि उद्याही.. शिवप्रताप- गरूडझेप…2022. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाच्या टीझरला सध्या तुफान प्रतिसाद मिळत असलेला पहायला मिळतोय. प्रेक्षकांची उस्तुकताही जोरदार असल्याचं चित्र दिसतंय. हेही वाचा - आकाश ठोसरने सायकलने गाठला पुणे ते लोणावळा पल्ला; अभिनेत्याने केला इतक्या तासांचा प्रवास औरंगजेबाच्या बलाढ्या सेनेचा फौलादी पहाऱ्यावर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांच्याआग्र्याहून सुटकेचा प्रसंग पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. हा प्रसंग 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटातून पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न डाॅ. कोल्हे यांनी केला आहे. आज भव्यदिव्य टीझर प्रदर्शित झाला असून टीझरनं चाहत्यांची आणखीनच उत्कंठा वाढवली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

  डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत स्वतः अमोल कोल्हे झळकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. 15 सेकंदाच्या टीझरनं सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. चित्रपटांत काय रोमांचक नजारा पहायला मिळणार यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. डाॅ. अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. कमेंटमध्ये चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद झळकत आहे. अमोल कोल्हेंची भूमिका, अभिनय पाहण्यासाठी आतुरता तर आहेच मात्र छत्रपतींचा इतिहास मोठ्या पडद्यावर दिसणार याचा एक वेगळाच आनंद आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या