मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अमिताभ बच्चन यांनी आगळावेगळा फोटो शेअर करत दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, मिळाल्या संमिश्र प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांनी आगळावेगळा फोटो शेअर करत दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, मिळाल्या संमिश्र प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांनी फारच वेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी फारच वेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी फारच वेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई, 26 जानेवारी-   आज देशात सर्वत्र 73 वा प्रजासत्ताक   (Republic Day)  दिवस साजरा केला जात आहे. सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन   (Amitabh Bachchan)   यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी फारच वेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर करत चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांची दाढी तिरंगा रंगात रंगवलेली आहे. हा अनोखा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी आपल्या आजच्या प्रजासत्ताक दिनाची सुरुवात केली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या या फोटोवर आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपला हा फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर आता या फोटोबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी कमेंट करत या गोष्टीला मजेत घेतलं आहे. तर काहींनी टीका केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे, 'देशाच्या तिरंग्याला असं दाढीवर रंगवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे'. तर एकाने कमेंट करत 'हे काय आहे' असं म्हटलं आहे. तर काहींनी यापेक्षा कठोर शब्दात टीका केली आहे.

तर दुसरीकडे काही कलाकारांनी या गोष्टीवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा फोटो पाहून कॉमेडियन कपिल शर्माला आपलं हसू आवरता आलं नाही. तर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चननेसुद्धा हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ते आगामी काळात अजय देवगनच्या रनवे 34, गुड बाय, झुंड, बटरफ्लाय, ब्रह्मास्त्र अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. शिवाय त्यांनी नुकताच कौन बनेगा करोडपतीचा 13 वा सीजन होस्ट केला आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Republic Day