S M L

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच सुरू करणार शूटिंग

मुंबईहून तीन डाॅक्टरांची एक टीम तातडीने जोधपूरला रवाना झालीये.

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2018 02:38 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच सुरू करणार शूटिंग

13 मार्च : बाॅलिवूडचा शहेशनहा अमिताभ बच्चन यांची ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या शूटिंगदरम्यान प्रकृती अचानक बिघडली होती.  मुंबईहून तीन डाॅक्टरांची एक टीम तातडीने जोधपूरला रवाना झाली. तिथे बिग बींना तपासल्यावर त्यांना डाॅक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय. शूटिंग पूर्ण झाल्याशिवाय ते मुंबईत परत येणार नाहीत.

अमिताभ बच्चन सध्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.  या सिनेमाचं शूटिंग जोधपूर इथं सुरू आहे. अमिताभ बच्चन गेल्या आठवड्याभरापासून जोधपूरमध्ये आहे. आज शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली.

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी ब्लाॅगवर याबद्दल माहिती दिली होती. दोन आठवड्यांपूर्वीच लिलावती हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी बीग बी दाखल झाले होते.

(सविस्तर बातमी लवकरच)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close