Home /News /entertainment /

वयाच्या 77 व्या वर्षीही बिग बी स्वतःला असं ठेवतात फिट, तरुणांनाही लाजवेल त्यांचा उत्साह

वयाच्या 77 व्या वर्षीही बिग बी स्वतःला असं ठेवतात फिट, तरुणांनाही लाजवेल त्यांचा उत्साह

सोशल मीडियावर सध्या अमिताभ बच्चन आणि त्यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा एक फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 21 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वच काम थांबली आहेत. पण सोशल मीडियावर मात्र धम्माल सुरू आहे. जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. प्रत्येकजण रोज काही ना काही फोटो शेअर करत असतोच. अशाच काहीशा कारणामुळे सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सध्या अमिताभ बच्चन आणि त्यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा एक फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात बिग बींच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह हा एखाद्या तरुणालाही लाजवेल असाच आहे. अमिताभ बच्चन सुद्धा आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात 77 वर्षांचे अमिताभ बच्चन त्यांचा नातू अगस्त्य नंदासोबत जीममध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटोमध्ये त्यांच्या हातात डंबल्स दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन याचा उत्साह त्यांच्या नातवापेक्षा कमी नाही.
  महानायक अमिताभ बच्चन सध्या घरच्या जिममध्ये व्यायाम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मी जिमला जातोय, जिम घरातच आहे असा उल्लेख फोटोद्वारे केला होता. आज बिग बींनी तरुणांच्या उत्साहाला सुद्धा लाजवेल असा उत्साहवर्धक सेल्फी घरातल्या जिममध्ये काढलाय. यात त्यांच्यासोबत त्यांचा नातू अगस्त्य नंदाससुद्धा दिसत आहे. त्यांची मुलगी श्वेताचा हा मुलगा आहे. त्यांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सर्वजण कमेंटमध्ये अमिताभ बच्चन यांचं कौतुक करताना दिसत आहेत. ...तर पुन्हा सुरू होऊ शकतं सिनेमांचं शूटिंग, CM उद्धव ठाकरेंनी दिले संकेत राणा दग्गुबतीचं चाहत्यांना गोड सरप्राइज, लॉकडाऊनमध्ये उरकला साखरपुडा; पाहा PHOTO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bollywood

  पुढील बातम्या