• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Video: शिट्टी मारून फोटोग्राफरला केलं बाजूला, अमिताभ यांनी पुन्हा रेकॉर्ड केला मुलीचा रँपवॉक

Video: शिट्टी मारून फोटोग्राफरला केलं बाजूला, अमिताभ यांनी पुन्हा रेकॉर्ड केला मुलीचा रँपवॉक

अमिताभ यांची कन्या श्वेता बच्चन यांनी काही दिवसांपुर्वीच एका कार्यक्रमात रॅंप वॉक केला होता. यामध्ये अमिताभ यांनी चक्क शीळ वाजवली कारण..

 • Share this:
  मुंबई, २७ मार्च- बॉलिवूडचा शहेनशहा अशी अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. पण खऱ्या आयुष्यात ते अगदी याच्या उलट आहेत. खासगी आयुष्यात ते फार साधे आहेत. कोणत्याही ठिकाणी अमिताभ यांचा साधेपणा लपून राहत नाही. बिग बींची मुलगी श्वेता बच्चन नंदाने नुकतीच प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी रँप वॉक केलं. आपल्या लेकीचा रँप वॉक पाहण्यासाठी अमिताभ आणि जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. आपल्या मुलीला रँपवर चालताना पाहताना बिग बींच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते. श्वेताची प्रत्येक झलक ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेत होते.
  अमिताभ यांचा श्वेताचा व्हिडिओ घेतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. श्वेताच्या रँपवॉकवेळी ते फार उत्साही होते. एवढंच काय तर त्यांनी शिट्टी वाजवून त्यांनी छायाचित्रकाराला श्वेता आणि त्यांच्या कॅमेऱ्याच्यामधून बाजूला व्हायला सांगितलं. फॅशन शोमध्ये श्वेता फार सुंदर दिसत होती. तिने आयवरी आणि सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता. यावेळी सोनम कपूरनेही रँप वॉक केला. सोनमच्या ग्रँड एंट्रीच्यावेळी प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह दिसून आला.
   
  View this post on Instagram
   

  Wolves in chic clothing 🐺 #abujanisandeepkhosla #50yearsofcpaa

  A post shared by S (@shwetabachchan) on

  सोनमने कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसिया या गाण्यावर नृत्य करत रँपवॉक केला. सोनेरी रंगाच्या आउटफिटमध्ये सोनमच सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. श्वेता बच्चन नंदा, सोनम कपूरसह प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरही मंचावर दिसला. या फॅशन शोचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO
  First published: