काम मिळावं म्हणून बिग बींनी दीपिका-कतरिनाला पाठवला बायोडाटा!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी चक्क काम मिळवण्यासाठी दीपिका आणि कतरिनाकडे आपला बायोडाटा पाठवला आहे. काय म्हणताय तुम्हाला खरं वाटत नाही का..?

Renuka Dhaybar | Updated On: Feb 19, 2018 01:36 PM IST

काम मिळावं म्हणून बिग बींनी दीपिका-कतरिनाला पाठवला बायोडाटा!

19 फेब्रुवारी : बिग बी अमिताभ बच्चन यांनी चक्क काम मिळवण्यासाठी दीपिका आणि कतरिनाकडे आपला बायोडाटा पाठवला आहे. काय म्हणताय तुम्हाला खरं वाटत नाही का..? पण प्रत्यक्षात तसंच घडलंय. सोशल मीडियावर बिग बींचा बायोडेटा चांगलाच व्हायरल झाला आहे. या बातमीत शाहिद कपूर आणि आमिर खान यांची उंची कमी असल्याने त्यांना दीपिका कतरिनासोबत काम करता येत नसल्याचं लिहिलं होतं. ही अडचण लक्षात आल्यावर बिग बींनी स्वतःहून पुढाकार घेत आपला बायोडाटा दोघींना शेअर केला आहे.

या बायोडाटामध्ये मी अमिताभ बच्चन, आणि आपल्याला 200 सिनेमात काम करण्याचा अनुभव असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. त्यासोबतच बऱ्यापैकी हिंदी बोलता येत असल्याचंही लिहिलंय. आणि उंचीच्या क्रायटेरियात फिट्ट बसत असल्यानं तुमच्यासोबत काम करायला तयार असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे. बिग बींची ही मिश्किल पोस्ट वाचल्यावर त्यांच्या फॉलोअर्सनीही त्यांना दाद दिली आहे.

 

सोशल मीडियावर त्यांनी जाहिरपणे काम मागितलं असल्यामुळं खरं तर ७६ वर्षांच्या अमिताभ यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एका वृत्तपत्रातील एक बातमीचे कात्रण शेअर करत, दीपिका व कॅटकडे जॉब अप्लिकेशन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2018 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close