ICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...

ICCची शाळा घेणाऱ्या बिग बींवर बरसले नेटकरी, म्हणाले...

बॉलिवूड स्टार परेश रावल यांच्यानंतर आता महानायक अमिताभ बच्चन यांनी ICCच्या नियमांची सोशल मीडियावरून खिल्ली उडवली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : ICC क्रिकेट वर्ल्डकपवर यंदा इंग्लंडनं आपलं नाव कोरलं मात्र ज्या निकषांच्या आधारे ICC नं इंग्लंडला विजयी घोषित केलं तो निर्णय खरं तर क्रिकेट प्रेमींनाही मान्य नाही. जास्त बाउंड्रीच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला. या निर्णयाच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र यानंतर सोशल मीडियवरून ICC वर प्रचंड टीकेची झोड उठली. यात बॉलिवूडकरही मागे नाहीत. बॉलिवूड स्टार परेश रावल यांच्यानंतर आता महानायक अमिताभ बच्चन यांनी ICCच्या नियमांची खिल्ली उडवली आहे. बिग बी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक जोक शेअर करत सुपर ओव्हर रुलवर प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र त्यांचा हा जोक त्यांच्यावरच उलटलेला दिसत आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून एक जोक शेअर केला. त्यांनी लिहिलं, तुमच्याकडे 2000 रुपये आहेत. माझ्याकडेही  2000 रुपये आहेत. पण तुमच्याकडे 2000 ची एक नोट आहे आणि माझ्याकडे 500 च्या 4 नोटा आहेत. सांगा सर्वात श्रीमंत कोण? ICC- ज्याच्याकडे 500 च्या जास्त नोटा आहेत तो व्यक्ती जास्त श्रीमंत. बिग बींनी हा जोक फक्त ICC ची खिल्ली उडवण्याच्या उद्देशान केला होता मात्र त्यांची ही चाल त्यांच्यावरच उलटली. बिग बींच्या या जोकवर नेटकऱ्यांनी पनामा पेपर लिक प्रकरणावरून त्यांचीच उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली.

मलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं

अमिताभ बच्चन यांना ICCची शाळा घेणं खूपच महागात पडलेलं दिसत आहेत. एका युजरनं या ट्वीटवर रिप्लाय देताना लिहिलं, माझ्याकडे ब्लँक पेपर आहे आणि तुमच्याकडे पनामा पेपर सांगा पाहू कोन फ्रॉड? तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, देवाची कृपा, पनामा जिंकले असते तर उत्सव यांच्या घरासमोरच झाला असता. आणखी एका युजरनं अमिताभ यांच्या ट्वीटवर उपरोधिक कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, नोटांबद्दल बोलत आहात पण पनामा काही कमी नाही.

अनुष्कानं सांगितलं वयाच्या 29 व्या वर्षी विराटशी लग्न करण्याचं कारण

अमिताभ यांचं नाव 2016मध्ये पनामा पेपर लिक प्रकरणात समोर आलं होतं. ज्याची आयकर विभाग अद्याप चौकशी करत आहे.  जगभरातील अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि श्रीमंत लोक आपली संपत्ती टॅक्स पासून वाचवण्यासाठी पनामाच्या लॉ फर्म मोसेक फोंसेकाच्या सेवांचा लाभ घेतात असा खुलासा या पेपर्स मधून झाला होता. ज्यात अमिताभ बच्चन यांच्यासमवेत भारतातील अनेकांचा समावेश होता. हे प्रकरण 2016 ला उघडकीस आलं होतं.

...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून!

===============================================================

कोंबडा भिडला सापला, VIDEO व्हायरल

First published: July 16, 2019, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading