S M L
Football World Cup 2018

'चलो इस बहाने अपनों का पता तो चला', बीग बींचं चाहत्यांसाठी भावनिक ट्विट

बिग बी अमिताभ बच्चन यांची 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांचे असंख्य चाहते त्यांची विचारपूस करत होते.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 08:01 PM IST

'चलो इस बहाने अपनों का पता तो चला', बीग बींचं चाहत्यांसाठी भावनिक ट्विट

14 मार्च : बिग बी अमिताभ बच्चन यांची 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांचे असंख्य चाहते त्यांची विचारपूस करत होते. त्यामुळे आपल्या चाहत्यांची काळजी मिटवण्यासाठी अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या आजारा संदर्भात अमिताभ यांनी एक भावनिक ट्विट केलं आहे.

'कुछ कष्ट बढा, चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पडा, इलाज प्रबल, स्वस्थ हुए नवल, चलो इस बहाने अपनों का पता तो चला' असं ट्विट बिग बींनी केलं आहे.

माझ्याविषयी आणि माझ्या तबेतीविषयी अनेकांनी माझी विचारपूस केली आणि म्हणून मला माझ्या, आपल्या लोकांशी भेट झाली असं बीग बी म्हणाले आहे.

या ट्विटसोबतच त्यांनी त्यांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. अमिताभ यांच्या या ट्विटमुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 08:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close