बिग बींनी बल्गेरियात रणबीर-आलियाला काय दिलं सरप्राईझ?

बिग बींनी बल्गेरियात रणबीर-आलियाला काय दिलं सरप्राईझ?

अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी बल्गेरियात आहेत. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली.

  • Share this:

मुंबई, 01 आॅगस्ट : अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी बल्गेरियात आहेत. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली.  बिग बींनी लगोलग ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कूकला सांगून संपूर्ण क्रूसाठी गरमा गरम वडापाव आणि सामोसे बनवायला सांगितले. त्यानंतर स्वतः सोशल मीडियाद्वारे ही बातमी आपल्या फॅन्सनाही सांगितली. सेटवर सगळ्यांनी त्याच्यावर मस्त ताव मारला.

वडापाव आणि सामोसे हे प्रत्येक भारतीयांचं आवडतं खाद्य. भारतीय व्यक्ती कुठेही गेली तरी त्याची मूळ आवडनिवड काही बदलत नाही. मग सर्वसामान्य, असोत नाहीतर सेलिब्रिटीज. आणि परदेशात असे पदार्थ खायला मिळणं यापेक्षा आनंद तो काय असणार. आणि अमिताभ बच्चन यांची इतरांबद्दल काळजी घेण्याची वृत्ती पाहता, सगळ्यांनाच भरून आलं. सेटवर प्रत्येक जणच आपल्या घराला मिस करत होतं. त्यामुळे वडापाव आणि सामोसे यांनी ती उणीव थोडी तरी भरून काढली.

बल्गेरियात सध्या ब्रम्हास्त्र सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या भूमिका सिनेमात आहेत. या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना, रणबीर आणि आलिया यांचं नातं गहिरं झालंय.

ब्रम्हास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.

सध्या बिग बी बल्गेरियात अहोरात्र शूट करतायत. आणि त्याची माहितीही सोशल मीडियावर टाकतायत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 10:38 AM IST

ताज्या बातम्या