S M L

शिवरायांच्या घराण्याकडून अमिताभ बच्चन यांचा गौरव

छत्रपती शिवाजी महाराज शाही घरण्याकडून देण्यात येणारा शिव-सन्मान पुरस्कार यावर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे.

Sachin Salve | Updated On: May 9, 2018 10:54 PM IST

शिवरायांच्या घराण्याकडून अमिताभ बच्चन यांचा गौरव

मुंबई, 09 मे : छत्रपती शिवाजी महाराज शाही घरण्याकडून देण्यात येणारा शिव-सन्मान पुरस्कार यावर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे, राजधानी महोत्सवात 27 मे रोजी अमिताभ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान केला जाणार अशी माहिती छत्रपतींचे वारस खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

छत्रपतींच्या शाही परिवाराकडून दरवर्षी भारताचे नाव जगभर पसरवल्या अत्यंत मान्यवर व्यक्तीला शिव-सन्मान पुरस्कार दिला जातो, यावर्षी हा मानाचा पुरस्कार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, नुकतेच उदयनराजे यांनी फडणवीस आणि पवार यांच्यासह मान्यवरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

अमिताभ यांच्याबरोबर सातारा जिल्ह्यातील मात्र देशपातळीवर कला, क्रीडा, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या 12 मान्यवरांचा गौराव भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 25 ते 27 मे च्या दरम्यान राजधानी महोत्सव होत असून या तीन दिवसात अनेक कल्पक कार्यक्रम होणार आहेत.देशपातळीवर होणाऱ्या विविध मोठ्या पुरस्काराच्या तोडीचा राजधानी महोत्सव असेल आणि त्याचे प्रक्षेपण 'झी मराठी'सह विविध वाहिन्यांवर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2018 10:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close