'अरे हा तर राजमहाल आहे', बिग बींकडून सीएसएमटी स्थानकाच्या इमारतीचं कौतुक

'अरे हा तर राजमहाल आहे', बिग बींकडून सीएसएमटी स्थानकाच्या इमारतीचं कौतुक

'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत म्हणजे राजमहालासारखी भासते. या सर्वांगसुंदर इमारतीत वावरताना ते एखादे स्थानक नसून महालाचा भास होतो' असे उद्गार दस्तुरखुद्द सुपरस्टार अमिताभ यांनी काढले आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 30 मे : 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत म्हणजे राजमहालासारखी भासते. या सर्वांगसुंदर इमारतीत वावरताना ते एखादे स्थानक नसून महालाचा भास होतो' असे उद्गार दस्तुरखुद्द सुपरस्टार अमिताभ यांनी काढले आहे. मध्य रेल्वेनं हाती घेतलेल्या 'एक सफर, रेल के साथ' या उपक्रमाच्या शूटिंगसाठी बिग बी अमिताभ बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात आले होते. तेव्हा ते स्थानकाची इमारत पाहून थक्क झाले होते.

सध्या रेल्वे रुळ ओलांडणं ही रेल्वेसमोर सगळ्यात मोठी समस्या आहे. यासाठीच रेल्वेनं सेफ्टी ट्रेसपासिंग कँम्पेन हाती घेतलं आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून एक जाहिरात चित्रीत केली जात आहे. या जाहिरातीतून बिग बीग अमिताभ बच्चन यांनी ट्रेसपासिंग टाळण्याचं आवाहन करणार आहेत. तसंच रेल्वेप्रवाशांना पादचारी पुलाचं महत्त्व  समजावताना अमिताभ बच्चन दिसणार आहे.

या चित्रीकरणासाठी रविवारी महानायक अमिताभ बच्चन यांनी जवळपास पाऊणेदोन तास हे स्थानकात घालवले. या इमारतीचे अनेक फोटो सुद्धा अमिताभ यांनी काढलेत. यावेळी त्यांनी 'हे स्थानक नसून एक राजमहल आहे' अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची स्तुती केली.

First published: May 30, 2018, 10:28 AM IST

ताज्या बातम्या