मुंबई, 02 ऑगस्ट : मनोरंजन विश्वातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आली आहे. त्यांना आजच घरी देखील सोडण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांना थोड्याच वेळात नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यानंतर त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे.
11 जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दरम्यान आता आराध्या-ऐश्वर्यानंतर बिग बींवरील देखील कोरोनाचे संकट टळले आहे. लगेच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.
(हे वाचा-...तर मुव्ही माफिया काय करू शकतात याची कल्पना करू शकतो- कंगना रणौत)
दरम्यान या कालावधीमध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन त्यांच्या फॉलोअर्स आणि हितचिंतकांना त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत अपडेट देत होते. दोन दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन याने हॉस्पिटलच्या कॉरीडॉरचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी बच्चन कुटुंबीयांना लवकर डिस्चार्ज मिळावा याबाबत प्रार्थना करणाऱ्या कमेंट्स केल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या चाहत्यांचे वेळोवेळी आभार मानले आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.