KBC Season 11 : अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण!

KBC Season 11 : अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण!

‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनची सुरुवात नुकतीच झाली. यात अमिताभ यांची सांगितला रोहितच्या नावाचा अर्ज.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019मध्ये टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मानं पाच शतकांची कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. क्रिकेट जगात रोहित शर्मा हिटमॅनच्या नावानं ओळखला जातो. मात्र अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेत रोहित शर्माच्या नावाचा खरा अर्थ सांगितला.

‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनची सुरुवात नुकतीच झाली. आतापर्यंत झालेल्या 2 एपिसोडमध्ये 3 स्पर्धकांनी हजेरी लावली असून चौथी स्पर्धक सरोज सिसोदिया हॉट सीटवर आहे. सर्वांनाच माहित आहे की, टीव्ही विश्वातला सर्वात यशस्वी शो 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये सुरु झाला होता. अमिताभ सध्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी एक स्पर्धकाला एक प्रश्न विचारला, ज्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माच्या नावाचा संबंध होता.

अमिताभ हॉट सिटवर दिल्लीच्या शाहदरा येथील रहिवाली रवी जैन यांना रोहित संदर्भात एक प्रश्न विचारला. अमिताभनं तिसऱ्या प्रश्नांच्या वेळी त्यांना, कोणत्या नावाचा अर्थ लाल रंग किंवा लाल रंगवाला असतो. यासाठी अमिताभ यांनी रोहित, हार्दिक, विजय, शिखर असे चार पर्याय दिले होते. दरम्यान रवी जैन यांना याचे उत्तर माहित नसल्यामुळं त्यांनी लाईफलाईन वापरली. यावेळी 77 टक्के जनतेनं रोहितच्या नावाला मत दिले. या उत्तरासह रवी जैन यांनी तीन हजार रूपयांचे बक्षिस जिंकले.

वाचा-KBC चा पहिला करोडपती सध्या काय करतो? 19 वर्षात 'असं' बदललं आयुष्य

राफेल नदालबाबतही विचारला प्रश्न

रवी जैन यांना अमिताभ यांनी, 2019मध्ये कोणत्या खेळाडूनं 12वे फ्रेंच ओपनचा किताब जिंकला होता असा प्रश्न विचारला. याचेही उत्तर रवी जैन यांना माहिती नव्हते. त्यांनी लाईफलाईनचा वापर करत, एक्सपर्ट एडवाइसचा वापर केला. या बरोबर उत्तरासह त्यांनी 80 हजार रूपयांचे बक्षिस जिंकले.

वाचा-‘या’ 11 खेळाडूंची टीम इंडियात जागा फिक्स! विराटनं सांगितली प्लेइंग इलेव्हन

वाचा-‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

Published by: Renuka Dhaybar
First published: August 22, 2019, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading