बिग बींच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला!

बिग बींच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला!

नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी त्याच्या हेल्थ संबंधीत काही अपडेट्स त्यांच्या चाहत्यांशी शेअर केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. आजही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पण या व्यतिरिक्त ते सोशल मीडियावरही तेवढेच सक्रिय असतात. ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते अनेकदा त्यांचे विचार आणि इतर अनेक गोष्टींबद्दल लिहित असतात. पण नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी त्याच्या हेल्थ संबंधीत काही अपडेट्स त्यांच्या चाहत्यांशी शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना काही काळासाठी कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सिने इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष पूर्ण केली. त्यांचा पहिला सिनेमा सात हिंदुस्तानी 7 नोव्हेंबर 1969 मध्ये रिलीज झाला होता. त्यानिमित्तानं त्यांनी त्याच्या जलसा बंगल्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, स्वर्गातून आलेल्या आणि स्टेथेस्कोप घातलेल्या या दूतांनी मला सल्ला दिला आहे. पण मी काम करत राहणार आहे.

मागच्याच महिन्यात कलाकारांना दिला जाणार सर्वात मानाचा पुरस्कार दादा साहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहिर झाला. त्यांचे 'झुंड', 'चेहरे', 'गुलाबो सिताबो' आणि 'ब्रह्मास्त्र' हे सिनेमे येत्या काळात प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

अभिषेकनं दिल्या वडील अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननं गुरुवारी 7 नोव्हेंबरला स्वतःला अमिताभ यांचा मुलगाच नाही तर चांगला प्रशंसक म्हणत बॉलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

अमिताभ यांचा पहिला सिनेमा सात हिंदुस्तानी 7 नोव्हेंबर 1969 मध्ये रिलीज झाला होता.

अभिषेकनं अमिताभ यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं, ‘फक्त त्यांचा मुलगा म्हणून नाही तर एक अभिनेता आणि एक प्रशंसक म्हणून आम्ही या महानतेचे साक्षीदार आहोत. त्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरच काही आहे.’

त्यानं पुढे लिहिलं, ‘सिनेमा प्रेमींच्या अनेक पीढ्या सांगतील की आम्ही बच्चन यांचा काळ पाहिला आहे. सिने जगतात 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तर पुढच्या 50 वर्षांची प्रतीक्षा आहे. लव्ह यू’ अभिषेकनं वडील अमिताभ यांच्यासोबत ‘सरकार’, ‘पा’, ‘बंटी और बबली’, आणि  ‘कभी अलविदा ना कहना’ या सिनेमात काम केलं आहे.

======================================================

VIDEO : कार्तिक एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

First published: November 8, 2019, 10:19 AM IST

ताज्या बातम्या