मुंबई, 15 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे विचार किंवा थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता त्यांनी मुलगा अभिषेक बच्चन याचं एक पत्र त्यांच्या ट्विटरवर शेअर केलं आहे. या पत्रात अभिषेक त्याचे वडील अमिताभ बच्चन यांना तुम्ही चिंता करु नका मी आई जया बच्चन, बहीण श्वेता बच्चन आणि घराची काळजी घेईन असा विश्वास देताना दिसत आहे. अभिषेकचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अभिषेकनं लिहिलं हे पत्र तेव्हाचं आहे, तेव्हा अमिताभ त्यांच्या घरापासून दूर सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. त्यावेळी आई आणि बहीणीसोबत राहत असलेला अभिषेक आपल्या वडीलांना खूप मिस करत होता. या पत्रात त्यानं बिग बींना मिस करताना लिहिलं, प्रिय बाबा, तुम्ही कसे आहात? आम्ही सर्व ठिक आहोत आणि मला तुमची खूप आठवण येत आहे. तुम्ही लवकर घरी या बाबा मी देवाकडे तुमच्या आनंदासाठी प्रार्थना करत आहे आणि देव माझी प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही चिंता करू नका मी आई, दीदी आणि घराची काळजी घेईन. मी कधी कधी खूप मस्ती करतो पण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाबा. तुमचा लाडका मुलगा अभिषेक.
OMG! राहुल बोसनंतर आणखी एका सेलिब्रेटीला 5 स्टार हॉटेलचा झटका
बिग बींनी अभिषेकचं हे पत्र शेअर करताना लिहिलं, हे पत्र अभिषेकनं तेव्हा लिहिलं होतं. जेव्हा मी खूप जास्त काळासाठी घरापासून लांब होतो. ‘पूत सपूत तो क्यों धन संचय ; पूत कपूत तो क्यों धन संचय'
Loading...T 3549 - Abhishek in his glory .. a letter to me when I was away on a long outdoor schedule ..
पूत सपूत तो क्यूँ धन संचय ; पूत कपूत तो क्यूँ धन संचय pic.twitter.com/Tatw1VU1oj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) 14 November 2019
अमिताभ यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अभिषेकनंही कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, हे पत्र मी पत्र लेखनाचा कोर्स करण्यापूर्वी लिहिलं होतं.
. @SrBachchan evidently before I took a creative letter writing course. ♂️ https://t.co/VWWMISYgat
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) 15 November 2019
बिग बींची ही पोस्ट अनेकजण लाइक करत आहेत. अभिनेत्री इलियाना डिक्रुज आणि गौहर खान यांनी पोस्टवर खूपच गोड अशी कमेंट केली आहे. गुरुवारी उशीरा पोस्ट केलेल्या या पोस्टला 23 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. अमिताभ बच्चन सध्या सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. याशिवाय त्यांचे ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’, ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘चेहरे’ हे चार सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
'या' कारणासाठी मलायकाशी लग्न करण्याचं टाळतोय अर्जुन कपूर?
'आई म्हणते शिवी देणं वाईट असतं', स्वरा भास्करनं ट्रोलर्सना सुनावलं
===========================================================
कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा