मुंबईकरांसाठी एवढं करूनही अमिताभ बच्चन झाले ट्रोल

मुंबईकरांसाठी एवढं करूनही अमिताभ बच्चन झाले ट्रोल

बिग बी यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. काहींनी जर तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचंच नव्हतं तर आता तरी का सांगितलं असा प्रश्न विचारला.

  • Share this:

मुंबई, 16 जून- गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून १५ जून रोजी सातजणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर या प्रसंगाची निंदा केली. मृत व्यक्तिंमध्ये २२ आणि २४ वर्षांची मुलं होती. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या आनंद महिंद्रांनी याबद्दल ट्वीट करत आपला राग स्पष्टपणे व्यक्त केला.

आनंद महिंद्रानी ट्वीट करत म्हटलं की, ‘खूप झालं आता... लोकांच्या आयुष्याशी खेळणं पुरे झालं. काही दिवसांपूर्वी मी स्वयंचलीत स्कॅव्हेंगिंग मशीनबद्दल ट्वीट केलं होतं. एका होतकरू मुलाने हे मशिन तयार केलं आहे. इतरांनीही वेगळ्या पद्धतीने हे मशीन तयार केलं आहे. त्यांचं हे ज्ञान घेण्यास कोणता अडथळा येत आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न असेल तर माझा विचार नक्की करा.’

हेही वाचा- बॉलिवूडच्या 'या' 5 सुपरस्टार बाबांनी आपल्या मुलांना दिले सर्वात महागडे गिफ्ट

आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटवर अमिताभ यांनी ट्वीट करत जे उत्तर दिलं ते सर्वांना आश्चर्यचकीत करणारं आहे. बॉलिवूडच्या शहेनशहाने लिहिले की, ‘आनंद, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेला २५ मशीन आणि एक ट्रक दिला आहे. मशीन वैयक्तिक लोकांना भेट देण्यात आली असून ट्रक बीएमसीला देण्यात आला आहे.औरंगाबादमध्ये या उत्पादनांची निर्मिती होते. आतापर्यंत याबद्दल काही बोललो नव्हतो. कारण मी काय दिलं हे सांगण्यासाठी ती भेट दिलेली नव्हती. जे घडलं ते फारच वाईट आहे.’

हेही वाचा- ...म्हणून शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेचं करायचं होतं अपहरण, स्वतःच सांगितलं कारण

बिग बी यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. काहींनी जर तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचंच नव्हतं तर आता तरी का सांगितलं असा प्रश्न विचारला. तर काहींनी बिग बी यांची बाजू घेत या घटनेशी निगडीत गोष्ट होती म्हणून त्यांनी ती सांगितली असं स्पष्ट केलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे. पण अद्याप मालकाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

महाराष्ट्रातील ठाणे येथेही 9 जून रोजी अशीच घटना घडली होती.  सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये एकूण आठ कामगार अडकले होते. यातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अन्य पाच जणांची प्रकृती खालावली होती. ढोकाळी परिसरातील ही घटना घडली होती.  अमित पुहाल (वय 20 वर्ष), अमन बादल (वय 21 वर्ष) आणि अजय बुंबक (वय 24 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा- ऐश्वर्यापासून नागाचैतन्यपर्यंत, जाणून घ्या 'या' 5 सेलिब्रिटींच्या लग्नातील खर्च

5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर

First published: June 16, 2019, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading