कोरोनाला हरवून बिग बी पुन्हा 'KBC 12' च्या सेटवर, शेअर केला PHOTO

कोरोनाला हरवून बिग बी पुन्हा 'KBC 12' च्या सेटवर, शेअर केला PHOTO

'मास्कमुळे लोक ओळखूही येत नाही. वातावरणात सतत एकप्रकारची भीती असते' असंही यावेळी बिग बी म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : कोरोनामुळे कौन बनेगा करोडपतीचं शूटिंगही बंद होतं. आता पुन्हा एकदा या शूटिंगला सुरुवात झाली आहे. कौन बनेगा करोडपती पुन्हा सुरू झालं आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतच कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यानंतर कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि संसर्ग टाळण्यासाठी सेटवर अत्यंत काटेकोरपणे नियमांचं पालन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा सुपरहिरो म्हटलं जातं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही उपचारादरम्यान त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवला आणि आता पुन्हा आपलं KBC सिझन 12 चं काम सुरू केलं आहे. या शूटिंगदम्यानचा त्यांनी एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

कौन बनेगा करोडपतीचं चित्रिकरण अखेर सुरू झालं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी याबद्दल त्यांच्या ब्लॉगवर सविस्तर लिहिलं. बिग बी यांना वगळता, अन्य सर्व क्रू मेंबर पीपीई किटमध्ये होते. कोरोनाप्रतिबंधक सर्व खबरदारी घेऊनच चित्रिकरण पार पडल. या सगळ्यामुळे सेटवरील वातावरण खूप बदलल्याचं पाहायला मिळत होतं. मास्कमुळे लोक ओळखूही येत नाही. वातावरणात सतत एकप्रकारची भीती असते असंही यावेळी बिग बी म्हणाले.

हे वाचा-SSR Case: समोर आलं इंग्लंड संघाचं कनेक्शन, रियावर गोलंदाजाचं ट्वीट व्हायरल

केबीसी'ला 20 वर्षं पूर्ण झाली यावर विश्वास बसत नाही. कोरोनामुळे सेटवर निळ्या रंगाचा जणू समुद्रच असतो. सगळे शांत, एकदम सतर्क आणि सतत खबरदारी, मास्क, निर्जंतुकीकरण आणि भीतीखाली...आज पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो, पण यंदा सगळंच वेगळं वाटतं आहे. आधीसारखं हसतखेळत काम होत नाही. कामाशिवाय कुणी बोलत नाही. असं वाटतं कोणत्यातरी प्रयोगशाळेत शांतपणे रासायनिक प्रयोग सुरू आहेत. चेहरे ओळखता येत नाहीत. कधीकधी तर भीती वाटते की आपण त्याच लोकांसोबत आहोत का. पण धैर्य दाखवून पुढे जावं लागतं असं बिग बी अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या