मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अमिताभ बच्चन यांनी अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्यावर केलेली कमेंट SEXIST? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अमिताभ बच्चन यांनी अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्यावर केलेली कमेंट SEXIST? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी KBC मध्ये गीता गोपीनाथ यांचं कौतुक करताना नेमके काय शब्द वापरले वाचा आणि सांगा...  तुम्हाला हे निखळ कौतुक वाटतं की ही Sexist कमेंट वाटते?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी KBC मध्ये गीता गोपीनाथ यांचं कौतुक करताना नेमके काय शब्द वापरले वाचा आणि सांगा... तुम्हाला हे निखळ कौतुक वाटतं की ही Sexist कमेंट वाटते?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी KBC मध्ये गीता गोपीनाथ यांचं कौतुक करताना नेमके काय शब्द वापरले वाचा आणि सांगा... तुम्हाला हे निखळ कौतुक वाटतं की ही Sexist कमेंट वाटते?

नवी दिल्ली, 22 जानेवारी: भारतीय वंशाच्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) या 2019 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थजत्ज्ञ म्हणून काम करत आहेत. बॉलीवूड अभिनेता आणि 'कौन बनेगा करोडपती' टीव्ही मालिकेचे (KBC) होस्ट अमिताभ बच्चन यांनी नुकताच IMF च्या संशोधन विभागाच्या संचालिका आणि आर्थिक फंडसंबंधित काऊन्सलर यांच्या संबंधित एक प्रश्न विचारला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांनी गीता गोपीनाथ यांच्याबाबत एक टिप्पणी केली. ती लिंगभेदक किंवा Sexist कमेंट आहे, असा आरोप ट्विटर वापरकर्ते करत आहेत.

खरं तर, शुक्रवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख गीता गोपीनाथ यांनी एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन त्यांचं कौतुक करीत आहेत. बच्चन यांच्या तोंडून त्यांचं कौतुक ऐकल्यानंतर भावुक झालेल्या गोपीनाथ यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण त्याही बिग बींच्या मोठ्या चाहत्या आहेत. या व्हिडिओवरून आता ट्विटर वापरकर्त्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे.

पण प्रत्यक्षात अमिताभ यांनी गीता गोपीनाथ यांच्याबद्दल उच्चारलेल्या शब्दांवरून इंटरनेटवर वादंग उठलं आहे. महिलांच्या कर्तृत्वावर शंका घेणारी लिंगभेदी मनोवृत्ती यातून दिसत असल्याचं काही यूजर्सचं म्हणणं आहे.

काय म्हणाले अमिताभ?

या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन समोर बसलेल्या एका स्पर्धकाला प्रश्न विचारत आहेत. ज्यामध्ये त्यांनी अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्याविषयी प्रश्न विचारला आहे. ज्यामध्ये त्यांनी गीता गोपीनाथ यांचा फोटो एका मोठ्या पडद्यावर दाखवून, असा प्रश्न विचारला आहे की, या फोटोत दिसणारी अर्थतज्ज्ञ कोण... 2019 पासून कोणत्या संस्थेशी संबंधित मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे?  त्यानंतर चार पर्याय दिले गेले.

त्याबद्दल बोलताना अमिताभ म्हणाले, "इनका चेहरा इतना खूबसूरत है कि उन्हें अर्थव्यवस्था के मुद्दे से कोई जोड़ ही नहीं सकता.'' नेमक्या याच वक्तव्याला अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

यादरम्यान, गीता गोपीनाथ यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांना 'Greatest of All Time' म्हणून संबोधलं आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गीता गोपीनाथ यांच्याबद्दल बोललेला प्रत्येक शब्द 'अगदी प्रामाणिकपणाने' बोलला गेला आहे.

मात्र अमिताभ बच्चन यांच्या या टिप्पणीवर बर्‍याच लोकांनी टीका केली आहे. अनेक ट्वीटर वापरकर्त्यांनी बीग बी यांचं हे विधान लैंगिकतावादी म्हणजेच महिलांविरूद्ध लैंगिक भावना व्यक्त करणारं आहे, असं म्हटलं आहे. गीता गोपीनाथ यांच्या ट्विटवर बर्‍याच लोकांनी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Amitabh Bachchan