सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

शीतल जवळपास ३५ वर्ष अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी होते. अमिताभ यांच्या यशामागे शीतल जैन यांचा फार मोठा हात होता.

  • Share this:

मुंबई, 09 जून- अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी राहिलेले शीतल जैन यांचं शनिवारी निधन झालं. शीतल यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. शीतल यांच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण बच्चन कुटुंबिय पोहोचलं होतं.

अमिताभ यांच्यासोबत मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्याही दिसले. शीतल यांना अंतिम दर्शन देताना बिग बी फार भावुक झाले होते. शीतल जवळपास ३५ वर्ष अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी होते. अमिताभ यांच्या यशामागे शीतल जैन यांचा फार मोठा हात होता. अमिताभ यांनी जेव्हा फिल्मी करिअर सुरू केलं तेव्हापासून शीतल त्यांच्यासोबत होते. शीतल यांनी वासु भागनानी यांच्यासोबत मिळून अमिताभ बच्चन यांच्या 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाची निर्मिती केली होती.

या अभिनेत्रीला आईने मारून काढलं होतं घराबाहेर, तिने वडिलांवर लावला १२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

View this post on Instagram

#aishwaryaraibachchan at late #sheetaljain funeral #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय गोविंदा, परेश रावल, रवीना टंडन, सतीश कौशिर आणि असरानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. १९९८ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. शीतल यांच्या निधनावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

सारा अली खान की तारा सुतारिया, तुम्हाला कोणाचा समर लूक जास्त आवडला?

View this post on Instagram

#amitabhbachchan lost his long time secretary #sheetaljain today. #rip

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘शीतल यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. ते फार दयाळू आणि प्रेमळ होते. सिनेसृष्टी त्यांना कधीच विसरणार नाही.’ अनुपम खेर यांनी ट्वीट करत शितल जैन यांना श्रद्धांजली दिली. त्यांनी लिहिले की, ‘मी अनेक वर्ष त्यांना अमिताभ बच्चन यांचे सेक्रेटरी म्हणून ओळखायचो. ते स्वभावाने फार चांगले होते. कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची देव ताकद देवो.’

VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

First published: June 9, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या