मुंबई 11 एप्रिल: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे चित्रपटांसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील नेहमीच चर्चेत असतात. ते काय खातात? कुठले कपडे घालतात? कोणाला भेटतात? कुठे फिरायला जातात? त्यांचे चाहते अशा अनेक प्रश्नांची उत्तर कायम शोधत असतात. लक्षवेधी बाब म्हणजे बिग बींसोबतच त्यांच्या जलसा या बंगल्याचं देखील चाहत्यांना विशेष आकर्षण आहे. (Amitabh Bachchan jalsa bangla) मुंबईत येणार प्रत्येकजण किमान एकदा तरी हा बंगला पाहण्यासाठी जातो. खरं सांगायचं झालं तर बिग राहायाला येण्याच्या आधीपासून हा बंगला सेलिब्रिटी म्हणून ओळखला जायचा. मग प्रश्न असा पडतो असं कोण राहायचं आधी या बंगल्यात?
अमिताभ बच्चन याच्या घराची मालकी अधी प्रसिद्ध चित्रपट निर्माता एनसी सिप्पी (NC Sippy) यांच्याकडे होती. ते स्वत: या घरात राहायचे. विशेष 70च्या दशकात या बंगल्यात आनंद, नमक हराम, चुपके चुपके, सत्ते पे सता यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं चित्रीकरण केलं गेलं आहे. हा बंगला कधीकाळी फिल्म स्टुडिओ म्हणूनही वापरला जात होता. पुढे 80च्या दशकात बिग बींनी हा बंगला त्यांच्याकडून खरेदी केला. अन् त्याला जलसा असं नाव दिलं.
अवश्य पाहा - ‘इंद्रानगरच्या गुंडा शांत हो’; चित्रांगदानं घेतली राहुल द्रविडची फिरकी
T 3870 -'Chupke Chupke ',with Hrishi Da, closing in to 46 years today .. that house that you see in the pic with Jaya .. is now Jalsa my home, bought & rebuilt .. many films shot there - Anand, Namak Haram, Chupke Chupke , Satte pe Satta it was Producer NC Sippy's house , then.. pic.twitter.com/UMKJ6OaWoK
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 10, 2021
बिग बींनी एका ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा या बंगल्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “आम्ही या बंगल्याला खरेदी केलं. मग विकलं आणि पुन्हा एकदा विकत घेतलं. या बंगल्यात माझ्या खूप आठवणी आहेत. आनंद, नमक हराम, चुपके चुपके, सत्ते पे सता अशा अनेक चित्रपटांच्या चित्रीकरण इथे केलं गेलंय. आजही त्या आठवणी तशाच आहेत.” अशा आशयाच्या ट्विट सोबत त्यांनी स्वत:चे काही जुने फोटो देखील शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Marathi entertainment