मुंबई, 29 मार्च : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉक्स ऑफिसवर एकाहून एक दमदार सिनेमे केले आहेत. वयाच्या 75व्या वर्षीही ते आपल्या लुक्स आणि फॅशननं प्रेक्षकांना प्रेमात पाडत आहेत. बिग बींचा दीवार हा सिनेमा चांगलाच गाजला. सिनेमात बिग बींनी विजय वर्मा ही भूमिका साकारली होती. 1975मध्ये आलेल्या या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. सिनेमातील विजय वर्माच्या शर्टाची स्टाइल देखील त्या काळी चांगलीच गाजली होती. पण तुम्हाला माहिती आहे का बिग बींनी सिनेमात कोणतंही कॉस्टुम डिझाइन केलं नव्हतं. साध्या शर्टची केवळ गाठ मारली आणि विजय वर्माची ती स्टाइल रातोरात हिट झाली. यामागे एक मजेदार कहाणी आहे.
बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी सोशल मीडियावर दीवार सिनेमातील हा किस्सा शेअर केला होता. दीवार सिनेमातील अमिताभ बच्चनची यांची स्टाइल आजही अनेक लोक फॉलो करताना दिसतात. पण स्टाइल नव्हतीच. सिनेमातील त्यांचा लुक वेगळाच होता. पण एका घटनेमुळे बिग बींना तो शर्ट घालावा लागला होता.
हेही वाचा - या प्रसिद्ध कॉमेडियनला होत्या 3 बायका अन् 6 मुलं; 35 वर्ष लहान मुलीशी बांधलेली तिसऱ्यांदा लग्नगाठ
बिग बींनी सांगितंल होतं की, "ते दिवस काय होते... आणि तो गाठ मारलेला शर्ट. याची एक कहाणी आहे. दीवार सिनेमाच्या शुटींगचा पहिला दिवस होता. शॉर्ट रेडी झाला. कॅमेरा रोल होण्यासाठी तयार होता. मी कपडे घालण्यासाठी घेतले तेव्हा लक्षात आलं की टेलरनं शर्ट खूप लांब शिवला होता. माझ्या गुडघ्यांपर्यंत शर्ट आला होता. डायरेक्टर दुसरा शर्ट रिप्लेस करण्याची वाट पाहू शकत नव्हते. त्यामुळे त्या शर्टला गाठ मारायला सांगितली आणि पहिला सीन शुट केला".
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या आठवणीनं प्रेक्षकांना देखील अनेक वर्षांनी ते स्टाइल करत असलेल्या शर्टाची स्टाइल नव्हती तर टेलरची चुक होतं हे कळलं. बिग बींचा दीवार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. सिनेमा बिग बींबरोबर अभिनेता शशि कूर, परबीन बाबी आणि नीतू सिंह सारखे तगडे कलाकार होते.
दीवार सिनेमाची कहाणी अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान यांच्यावर आधारित होती. बिग बींनी हाजी मस्तान ही भूमिका साकारली होती. सिनेमात दोन भावांची कहाणी दाखवण्यात आली होती. जे लहानपणापासून आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांचा सामना करत आहे. पण आपलं आयुष्य जगण्यासाठी ते वेग-वेगळा रस्ता निवडतात. या दोन भावांमध्ये निर्माण झालेली भिंत हीच दीवारची कहाणी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News