अमिताभ बच्चन असं करणार त्यांच्या संपत्तीचं वाटप, वाचा कोणाला काय मिळणार

अमिताभ बच्चन असं करणार त्यांच्या संपत्तीचं वाटप, वाचा कोणाला काय मिळणार

काही दिवसांपूर्वी अमिताभ एका स्पर्धकाची जीवन कथा ऐकून एवढे भावुक झाले की त्यांनी आपल्या प्रॉपर्टीबाबत मोठा खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : बॉलिवूडचे शहंशाह म्हणजे अमिताभ बच्चन सध्या त्यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती 11’मुळे खूप चर्चेत आहेत. या शोमध्ये प्रश्नोत्तरांपेक्षा तिथं पर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांच्या संघर्षांचीच चर्चा जास्त होते. KBCच्या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची काहानी अमिताभ बच्चन अशी सांगतात की, ते स्वतःचीच काहानी सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ एका स्पर्धकाची जीवन कथा ऐकून एवढे भावुक झाले की त्यांनी आपल्या प्रॉपर्टीबाबत मोठा खुलासा केला. आपल्या संपत्तीचं वाटप कशाप्रकारे करणार हे त्यांनी या शोमध्ये स्पष्ट केलं.

मागच्या शुक्रवारी म्हणजे 23 ऑगस्टला KBC 11 चा कर्मवीर स्पेशल एपिसोड प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये समाज सेविका सिंधुताई सकपाळ एक खास पाहुणी म्हणून पोहोचल्या होत्या. त्यांनी हॉट सीटवर बसून प्रश्नांची उत्तर दिली आणि आपल्या संघर्षाच्या काळातली कथाही सांगितली. सिंधुताई एक अनाथ आश्रम चालवतात. ज्यात आतापर्यंत 1200 मुलांना आधार मिळाला आहे. यावेळी सिंधुताईंना तुमच्या आश्रमात सर्वाधिक मुली आहेत की, मुलं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या उत्तरल्या, ‘मुली जास्त आहेत. मी सर्वात आधी मुलींना घेते. कारण त्यांची सुरक्षा जास्त गरजेची आहे.’

प्रियांका-दीपिकाला पाहिल्यावर येते उलटी, पाकिस्तानी अँकर बरळला

अमिताभ बच्चन सिंधुताईंची कथा ऐकून भावुक झाले आणि म्हणाले, मी याधीही सांगितलं आहे आणि आताही तेच सांगतो, जेव्हा माझं मृत्यू होईल त्यावेळी माझं जे काही असेल ते सर्व माझी दोन्ही मुलं म्हणजे माझा मुलगा आणि मुलगी दोघांनाही अर्ध अर्ध मिळेल. त्याचबरोबर ते दोघांनाही समान मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांची एकून संपत्ती जवळपास 475 कोटींची आहे.

स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलला या व्यक्तीनं बनवलं फेमस, कोण आहे ‘तो’

या शोमध्ये अमिताभ यांनी सिंधुताईंना एका लहान मुलीबद्दल विचारलं जी त्यांच्यासोबत आली होती. यावर सिंधुताईंची मुलगी ममता सांगते, ‘आमच्याकडे रात्री उशीरा एक कॉल आला होता. ताई एका मुलीचा जन्म झाला आहे. तुम्ही ठेऊन घेऊ शकता का? ते म्हणाले, तुम्ही ठेऊ शकत नसाल तर आम्ही काहीतरी वेगळा पर्याय शोधू. हे ऐकल्यावर ताईंनी त्या मुलीला ठेऊन घेतलं. जेव्हा ती मुलगी आम्हाला मिळाली त्यावेळी तिची तब्बेत खूप खराब होती. 10 दिवस तिला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं.’ ही काहानी ऐकल्यावर सर्व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं.

शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया

===================================================================

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या