पाकिस्तानी होण्यास अमिताभ बच्चन यांनी दिला नकार, काय आहे पूर्ण प्रकरण?

पाकिस्तानी होण्यास अमिताभ बच्चन यांनी दिला नकार, काय आहे पूर्ण प्रकरण?

ऑस्कर विजेते रेसल पोक्यूटी यांनी त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी अमिताभ यांना विचारले होते.

  • Share this:

मुंबई, १० एप्रिल- बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन सध्या 'तेरा यार हूं मैं' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. हा सिनेमा हिंदी, बंगाली आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण दरम्यान अशाही गोष्टींची चर्चा सुरू आहे की अमिताभ यांना हॉलिवूडमधून एका भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण बिग बी यांनी त्या सिनेमाला नकार दिला.

डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शनात पदार्पण करणारे आणि ऑस्कर विजेते रेसल पोक्यूटी यांनी त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी अमिताभ यांना विचारले. या सिनेमात अमिताभ यांना एक पाकिस्तानी व्यक्तिरेखा साकारायची होती.

मिळालेल्या वृत्तानुसार सुरुवातीला अमिताभ या सिनेमात काम करायला तयार होते. मात्र 'ब्रह्मास्त्र' आणि 'तेरा यार हूं मैं' सिनेमाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांच्याकडे या हॉलिवूड सिनेमासाठी तारखा उपलब्ध नव्हत्या. यामुळेच त्यांनी या सिनेमात काम करायला नकार दिला.

काहींच्या मते, सिनेमात साकाराव्या लागणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तिरेखेमुळे बिग बी यांनी सिनेमाला नकार दिला असं म्हटलं जातंय. दोन वर्षांपूर्वी जेव्हा रसेल आणि अमिताभ यांच्यात या सिनेमा आणि व्यक्तिरेखेबद्दल चर्चा झाली तेव्हा अमिताभ यांना स्क्रिप्ट आवडली होती. पण आता भारत- पाकिस्तान देशातील तणावाची परिस्थिती पाहता अमिताभ यांनी पाकिस्तानी व्यक्तिरेखा न करण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी लवकरच अमिताभ रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत करण जोहरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहेत.

VIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

First published: April 10, 2019, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading