अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस...पण मागितली सर्वांची माफी

अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस...पण मागितली सर्वांची माफी

लस घेतल्यानंतर त्यांनी असं काही वक्तव्य केलं की जासाठी त्यांना माफी मागावी लागली. तर मग पाहुया असं काय म्हणाले होते बिग बी?

  • Share this:

मुंबई 16 मे: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्वीट्स, फोटो, व्हिडीओ यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी देखील त्यांनी अशी एक गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. बिग बींनी नुकताच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. (Covid-19 vaccine) अन् लस घेतानाचा फोटो देखील शेअर केला. मात्र ही लस घेतल्यानंतर त्यांनी असं काही वक्तव्य केलं की जासाठी त्यांना माफी मागावी लागली. तर मग पाहुया असं काय म्हणाले होते बिग बी?

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत बिग बींनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्याच सांगितलं यावेळी कॅप्शनमध्ये ते म्हणाले, “दुसराही झाला.. कोव्हिड वाला.. क्रिकेटवाला नाही…सॉरी सॉरी हे खूपच वाईट होतं.” असं मजेशीर कॅप्शन देत त्यांनी सोबतच काही हसण्याचे इमोजी दिले आहेत. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जन्नत फेम सोनल चौहान का झाली बॉलिवूडमधून गायब? काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई

कोरोना काळात अमिताभ बच्चन यांनी कोणालाही मदत केली नाही अशी टीका त्यांच्यावर केली जात होती. अखेर ट्रोलर्सच्या वाढत्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी बिग बींनी आपल्या ब्लॉगवर केलेल्या मदतीची एक यादीच शेअर केली होती. या यादीमुळं टीकाकारांची बोलतीच बंद झाली होती.

Published by: Mandar Gurav
First published: May 16, 2021, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या