मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Amitabh Bachchan: अमिताभ यांचं गिफ्ट राजू श्रीवास्तव यांच्यासाठी ठरणार रामबाण औषध? पाठवला खास ऑडिओ

Amitabh Bachchan: अमिताभ यांचं गिफ्ट राजू श्रीवास्तव यांच्यासाठी ठरणार रामबाण औषध? पाठवला खास ऑडिओ

 प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    मुंबई, 13 ऑगस्ट-   प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जगभरातून त्यांचे चाहते आणि कलाकार मित्र त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. अशातच आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी राजू यांच्यासाठी एक खास काम केलं आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळची जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टर चिंतेत होते. डॉ.अनन्या गुप्ता यांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांची बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला सामान्य वॉर्डात हलवलं जातं. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतकी कायम होती. दरम्यान कॉमेडियनच्या निधनाच्या अफवादेखील पसरल्या होत्या. मात्र काल त्यांच्या कुटुंबाने या निव्वळ अफवा असल्याचं सांगत त्यांची प्रकृती बऱ्या अंशी स्थिर असल्याचं सांगितलं आहे. तसेच राजू यांच्या कुटुंबीयांनी सर्वांना कॉमेडियनसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनदेखील केलं आहे. अशातच आता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी राजूसाठी काहीतरी खास केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन राजूची हेल्थ अपडेट जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र त्यांचा फोन बंद असल्याने अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान राजूच्या कुटुंबातील एका सदस्याने अमिताभ यांच्या कार्यालयात फोन करुन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. यावेळी बिग बीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की अमिताभ बच्चन यांनी राजूच्या मोबाईलवर अनेक मेसेजेस पाठवले आहेत. (हे वाचा:राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून पहिल्यांदाच आली महत्त्वाची अपडेट ) त्यांनतर त्यांच्या कुटुंबीयांनी राजूचा फोन चालू केला. आणि त्यांनी पाहिलं की अमिताभ बच्चन यांनी जवळजवळ 10 मेसेज केले होते. यामध्ये त्यांनी लिहलं होतं, 'खूप झालं.. आता उठ राजू, तुला अजून खूप काम करायचं आहे'. कुटुंबीयांनी हे मेसेज पाहून बिग बीना फोन करत त्यांचे आभार व्यक्त केले. आणि सोबतच त्यांना एक विनंती केली. त्यांनी म्हटलं की, जे मेसेज तुम्ही टाईप केले आहेत. ते कृपा करुन तुमच्या आवाजात पाठवाल का? यावर अमिताभ यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या आवाजात एक मेसेज रेकॉर्ड करुन तो राजूच्या कुटुंबियांना पाठवला. याबाबत बोलताना कुटुंबीयांनी सांगितलं की, मेसेजमुळे चमत्कार झाला असं नाहीय. पण हा मेसेज ऐकून अमित यांचा मोठा चाहता असणाऱ्या राजूला नक्कीच बरं वाटलं असणार आहे. आणि त्यामुळे त्याला लवकर ठीक होण्यास मदतही होऊ शकते'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Comedian, Entertainment

    पुढील बातम्या