तिसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी 15.28 लाख जणांना कोरोना लस, अमिताभ यांनीही घेतला पहिला डोस

तिसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी 15.28 लाख जणांना कोरोना लस, अमिताभ यांनीही घेतला पहिला डोस

महानायक अमिताभ बच्चन यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस (Amitabh Bachchan Received First Dose of Corona Vaccine) घेतला आहे. 78 वर्षीय अभिनेत्यानं आपल्या ब्लॉगवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई 02 एप्रिल : देशभरात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. एक एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिलाचा दिवस होता. पहिल्याच दिवशी 15.28 लाख जणांनी कोरोना लस घेतली आहे. याशिवाय बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस (Amitabh Bachchan Received First Dose of Corona Vaccine) घेतला आहे. 78 वर्षीय अभिनेत्यानं आपल्या ब्लॉगवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. अभिषेक बच्चन वगळता कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं लसीचा पहिला डोस घेतला आहे.

अमिताभ यांनी लिहिलं, की व्हॅक्सिनेशन डन, संपूर्ण कुटुंबाची आणि स्टाफची कोरोना चाचणी केली. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यानंतर लस घेतली आहे. अभिषेक वगळता कुटुंबातील सर्व सदस्यांनी लस घेतली आहे. तो सध्या कामानिमित्त बाहेर असून लवकरच घरी परतेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. अभिनेत्यानं लस घेतानाही आपले फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 6.75 हून अधिक लोकांना कोरोना लस (Vaccination in India) देण्यात आली आहे. यात आरोग्य कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात कर्मचारी, साठ वर्षावरील व्यक्ती आणि विशिष्ठ आजारांनी ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षावरील व्यक्तींचाही समावेश आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता सरकारनं सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीदेखील खासगी आणि सरकारी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची मोहिम सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, केंद्रानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिलं असून यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 2, 2021, 9:52 AM IST

ताज्या बातम्या