मुंबई, 14 डिसेंबर : जनमानसात अखंड लोकप्रियता मिळवलेले महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचे अनेक डायलॉग्ज आजही लोकांच्या ओठांवर असतात. 'दुश्मन से अगर फायदा हो तो उसे अपना दोस्त बना लो', 'रिश्तेमें तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहेनशाह', 'पैसा तो हर कोई कमाता है... लेकिन इज्जत कमाना सबके बसकी बात नहीं' अशा ओळींची जादू लोकांवर कायम आहे. 'आज खुश तो बहोत होगे तुम...'सुद्धा त्यापैकीच एक.
या संवादावर 'फील क्रू' नावाच्या डान्स ग्रुपने दिलेला अनोखा परफॉर्मन्स ग्रुपच्या चाहत्यांसह खुद्द अमिताभ यांनाही बेहद आवडला. विशेष म्हणजे त्यांनी तो आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टा अकाउंटवरही शेअर करत कौतुक केलेय. 'फील क्रू' हा 18 ते 21 वयोगटातल्या भन्नाट डान्सर्सचा ग्रुप असून एका 'रियॅलिटी शो'मध्ये त्यांनी हा परफॉर्मन्स दिलाय.
हा व्हिडीओ शेअर करताना अमिताभ यांनी लिहिलंय, 'दिवार. पटकथाकार सलीम-जावेद जोडीने लिहिलेला हा संवाद असा डान्सरुपात समोर येईल याची कधी कल्पनाही केली नव्हती.
काय आहे डायलॉग?
'आज खुश तो बहोत होगे तुम... जो आजतक तुम्हारे मंदिर की सीढियां नहीं चढा, जिसने आजतक तुम्हारे सामने सिर नहीं झुकाया... जिसने आजतक तुम्हारे सामने कभी हाथ नहीं जोडे वो आज तुम्हारे सामने हाथ फैलाए खडा है.'
View this post on Instagram
बहुत खुश होगे कि आज मै यहां आया. लेकिन तुम जानते हो कि जिस वक्त मैं यहां खडा हूं... वो औरत जिसके माथे से तुम्हारी चौखट का पत्थर घिस गया... वो औरत, जिस पर जुल्म बढे, तो उसकी पूजा बढी. वो औरत जिसपर जुल्म हुए, वो औरत जो जिंदगी भर जलती रही, लेकिन तुम्हारे मंदिर में दीप जलाती रही. वो औरत आज जिंदगी और मौत की सरहद पर खडी है. ये तुम्हारी हार है.'
'क्या कसूर है उसका, कौनसा पाप जुर्म किया है उसने... क्या उसका जुर्म ये है के वो मेरी माँ है... क्या वसाका जुर्म ये है कि उसने मुझे जन्म दिया है. क्या उसका जुर्म ये है कि मै उससे प्यार करता हूं. ये किस जुर्म की सजा दी जा रही है उसे... हम घर से बेघर हो गये, मेरा बाप जीते जी मर गया. मेरी माँ सुहागन होते हुए भी विधवा बनी रही. मैने तुमसे कुछ नहीं मांगा. आज मांगता हूं. मेरी माँ मुझे वापस दे दो. मेरी माँ मुझे वापस दे दो... '
सध्या अमिताभ 'कौन बनेगा करोडपती'मध्ये व्यग्र आहेत. येत्या काळात ते 'झुंड', 'चेहरे' आणि 'ब्रम्हास्त्र'सारख्या चित्रपटांमध्ये दिसतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Instagram, Reality show